त्या बड्या नेत्याचा… रोहित पवार यांचा अजित पवार विमान अपघाताबद्दल खळबळजनक खुलासा, थेट…
Tv9 Marathi February 21, 2026 05:45 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघाताची काही व्हिडीओ पुढे आली. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अजित पवार यांचे विमान हवेतच एका बाजूला झुकताना दिसले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी गंभीर आरोप केली आहेत. आता दिल्लीमध्ये रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी थेट राहुल गांधी यांना विनंती करून म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी या विषयात लक्ष घालून विषय मांडला पाहिजे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्येही पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, VSR कंपनीच्या मागे मोठे लोक आहेत. त्यामध्येच कंपनीला वाचवले जात आहे. VSR कंपनीला एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे. नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आम्ही मोदी आणि अमित शाह यांच्याकडे मागणी करत आहोत.

रोहित पवार यांनी म्हटले की, केंद्रीय उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा मिळाला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले. पण त्याला ते सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाही. आमचे लोक माहिती मागत आहेत, पण त्यांना माहिती दिली जात नाही. आम्ही माहिती मागितली की, आम्हाला बीजेपीवाले सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. बीजेपीचे ट्रोलर्स ट्रोलिंग करत आहेत.

या ट्रोलिंगच्या मागे नक्की कोण आहे? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. यामुळे दुसरा काही अॅंगल आहे का? असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सतत गंभीर आरोप केली जात आहेत. अनेक मोठे अधिकारी VSR ला मदत करत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.