Priyanka Chopra On Bollywood: बॉलिवूड (Bollywood News) आणि हॉलिवूड (Hollywood News) दोन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारी 'देसी गर्ल' म्हणजेच, प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra). कित्येक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा 'द ब्लफ'मुळे (The Bluff) चर्चेत आहे. सध्या ती हॉलिवूड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची सारेच आतुरतेनं वाट पाहत आहेत. कित्येक वर्षांनी प्रियांका चोप्रा भारतीय सिनेसृष्टीत काम करताना दिसणार आहे. त्यामुळे तिच्या कमबॅकची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना प्रियांकानं बॉलिवूडपासून दूर राहण्याचं कारण सांगितलं आहे.
प्रियांका चोप्रानं 'फर्स्ट पोस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, "मला कधीच बॉलिवूड सोडायचं नव्हतं, जेव्हा मी हिंदी सिनेमे करत होते, तेव्हा मला अनेक कारणांमुळे मर्यादित असल्यासारखं वाटायला लागलेलं... मला अडकल्यासारखं वाटत होतं... मी अशा संधी शोधत होते, ज्या मला एक कलाकार म्हणून उत्साहित करतील. मग मी अमेरिकेत काम करायला सुरुवात केली. पण त्याच वेळी, मला माझे काम आवडते. मी भारतात वाराणसी चित्रपट करण्यासाठी उत्सुक आहे. मी हॉलिवूड आणि बॉलिवूड यापैकी एक निवडू शकत नाही. मला दोन्हीमध्ये काम करायला आवडते..."
View this post on Instagram
प्रियांकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, साऊथ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'वाराणसी' 2027 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रियांका चोप्रा साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
दरम्यान, प्रियांका चोप्रा यापूर्वी शेवटची 2019 मध्ये आलेल्या 'द स्काय इज पिंक' सिनेमात दिसलेली. शोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित सराफ यांनीही भूमिका केल्या होत्या. आता, आठ वर्षांनंतर, प्रियांका चोप्रा 'वाराणसी' सिनेमात काम करताना दिसणार आहे. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तिनं 2018 मध्ये हॉलिवूड गायक निक जोनासशी लग्न केलं. प्रियांका चोप्रानं 2022 मध्ये सरोगसीद्वारे तिची मुलगी मालती मेरीचं स्वागत केलं.