Sangli Bank Exam Centre : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नोकर भरतीमधील उमेदवारांची परीक्षा २८ फेब्रुवारीला जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबवली जात आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे घेतली गेली नव्हती. परीक्षेची तारीख आय.बी.पी.एस कंपनीकडून २८ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे.
जिल्हा बँकेने आय.बी.पी.एस. मार्फत भरती प्रक्रिया जाहीर करताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव व म्हापसा अशी पाच ठिकाणे जाहीर केली होती. मात्र, लिपिक पदाच्या या भरतीसाठी जिल्हाभरातून ५०७७ अर्ज प्राप्त झाल्याने पूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या पाच ठिकाणांमध्ये सर्व अर्जदार उमेदवारांची संख्या सामाविष्ट होणे शक्य नसल्याने तसेच आवश्यक त्या प्रमाणात परीक्षा केंद्रांची उपलब्धता नसल्याने परीक्षा सुरळीत होण्यासाठी नव्याने आणखी पाच परीक्षा ठिकाणे जाहीर केली आहेत.
त्यामुळे आता ही परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई, म्हापसा, मडगाव, पणजी अशा दहा ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवार यांना त्यांच्या हॉल तिकिटाबाबतचा मेसेज परीक्षा फॉर्म भरताना नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर व फॉर्ममधील नमूद मोबाईल नंबरवर आय.बी.पी.एस. कंपनीकडून पाठवण्यात येणार आहे.
Sindhudurg Bank Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 73 जागांसाठी 5 हजारांहून अधिक अर्ज; तुमची परीक्षा कुठे आणि कधी होणार?परीक्षार्थींचे हॉल तिकीट बँकेच्या संकेतस्थळावर आयबीपीएसच्या लिंकवरून २३ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहेत. या लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावयाचे आहे. हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्यावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह रिपोर्टिंग टाइमिंगच्या पंधरा मिनिटे आधी संबंधुत परूक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे.
उमेदवारांनी आपला इ-मेल दररोज तपासावा व बँकेच्या संकेतस्थळावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे. सर्व पात्र परीक्षार्थींनी वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे जिल्हा बँकेच्यावतीने आवाहन केले आहे.