Is Malaika Arora Dating Harsh Mehta?: अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते वयाची पन्नाशी ओलांडूनही ती तिशीतील दिसत असल्यामुळे चाहत्यांना तिचं खुप आकर्षण आहे. अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे देखील तिची नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते.
मलायका चित्रपटांमधील कामापेक्षा तिचं खासगी आयुष्य अनेकदा जास्त लक्ष वेधून घेतं. तिच्या वैयक्तिक नातेसंबंधांवाचत समाजमाध्यमावर सातत्याने चर्चा रंगलाना दिसतात. अलीकडेच मलावकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हावरल झाली असून, त्यामुळे तिच नाव एका बिझनेसमनशी जोडलं जात आहे.
हे फोटो हिरे व्यवसायाशी संबंधित असलेल्या हर्ष मेहता याच्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोमध्ये एक तरुण व्यक्ती सेल्फी घेताना दिसत असून, त्याच्या बाजूला उभी असलेली व्यक्ती मलायका असल्याचं काही युजर्सकडून म्हटले जात आहे. हे फोटो इटलीतील रोम इथं काढण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
View this post on InstagramA post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
दरम्यान यापूर्वी तिचं नाव अभिनेता अर्जुन कपूर याच्याशी जोडलं गेलं होतं. त्यांचं नातं काही काळ चर्चेत राहिल्यानंतर दोघे वेगळे झाल्याचं समोर आलं. त्याआधी मलायकाने अभिनेता अरबाज खानशी विवाह केला होता. २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला असून, त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे.
"हे नातं नक्की काय आहे?" समंथाचा दिग्दर्शकासोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल