Maharashtra Farmers: मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अपडेट, मुख्यमंत्री या दिवशी करणार घोषणा
Saam TV February 23, 2026 01:45 PM

राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर

कर्जमाफीची घोषणा होणार

अर्थसंकल्पात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होऊ शकते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे.

Maharashtra budget session : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे ३५ हजार ५०० कोटी रुपये थकले आहे. या शेतकऱ्याची कर्जमाफी दिला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे.

राज्यात गेल्या वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. दरदिवशी सात शेतकऱ्यांचा आत्महत्या होत असल्याचे अहवालात सांगितले आहे. नापिकी, हमीभाव , अतिवृष्टी, महापूर आणि दुष्काळामुळे २५ लाख शेतकऱ्यांना आता कर्ज दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या जाणार आहे. हा अहवाल मार्चअखेरीस सादर केला जाईल.

कर्जमाफी कशी असणार?

शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. याचसोबत बाकीचे कर्ज फेडण्यासाठी मुदत वाढवून दिली जाईल. पाच वर्षातील कर्जदाराना ५० हजार ते १ लाखांचे अनुदान दिले जाईल. तसेच एकरकमी परतफेड योजनेतून कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज दिले जाईल.

Farmer Stamp Duty Waiver : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! २ लाखांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; नेमकी काय आहे योजना? वाचा

कृषीमंत्र्यांनी काय म्हटलं?

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा विषय होता. बँकांकडून शेतकऱ्यांची कर्ज, अल्प,मध्यवम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची माहिती दिली जाणार आहे. या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल.त्यानुसार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.

Maharashtra Farmer Loan Waiver: मोठी बातमी! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी; कृषिमंत्र्यांची घोषणा
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.