Alia Bhatt Makes Stunning BAFTA 2026 Debut as Presenter video goes viral: आलिया भट्टने आपल्या टॅलेंट आणि अभिनयाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. तिनं नुकतंच ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉर्ड्स 2026 मध्ये पदार्पण करुन केवळ चाहत्यांनाच नाही तर, परदेशातील लोकांचीही मने जिंकली आहेत. तिनं प्रथम रेड कार्पेटवर तिच्या सुंदर शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नंतर जेव्हा ती स्टेजवर आली, तेव्हा तिनं आपल्या स्पीचची सुरुवात हिंदीत नमस्कार म्हणत केली. बाफ्टामधील आलियाने स्पीकर म्हणून सहभाग घेतला होता. तिच्या भाषणाने सर्वांची मन जिंकले आहेत.
आलियाने 'नमस्कार' म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. नंतर तिनं हिंदीत काही ओळी म्हटल्या. हिंदीत म्हटलेल्या ओळी तिनं इंग्रजीमध्ये समजावून सांगितल्या. यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून आलियाचं कौतुक केलं. बाफ्टा स्टेजवर आलिया भट्टला बोलावण्यापूर्वी, सूत्रसंचालक अॅलन कमिंग यांनी तिचं जोरदार स्वागत केलं. तिची उपस्थितांसमोर ओळख करुन दिली. तिच्या छोट्याशा भाषणात आलिया म्हणाली, 'पुढील अवार्ड अशा फिल्मसाठी आहे, जे इंग्रजी भाषेत नाही ', नंतर मिश्कीलपणे म्हटले की, 'आता सबटाइटल पाहण्याची तुम्हाला गरज नाही', तिनं पुढे सांगितले की, पुढील पुरस्कार श्रेणीची घोषणा हिंदी भाषेत करणार आहे.
स्टेजवर आलिया म्हणते, 'चित्रपट अनेक आवाजात बोलत जरी असले तरी, आपण सिनेमा या भाषेचा उत्सव साजरा करतो. आपण सगळे आपली भाषा प्रभावीपणे बोलतो', आलियाला प्रेझेंटर म्हणून पाहताच तिचं कौतुक करण्यात आलं. नेटकऱ्यांनी तिच्या कॉन्फिडेंस आणि मोहक लूकचे कौतुक केले. सध्या बाफ्टा अवॉर्ड्समध्ये केलेल्या सादरीकरणाबाबत आलियाची प्रशंसा केली जात आहे. तिनं या खास प्रसंगी सिल्व्हर रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता.
Proud Moment 🔥
— Always Bollywood (@AlwaysBollywood) February 23, 2026
Watch, BAFTA Awards 2026: #AliaBhatt begins her speech in with #namaskar followed by Hindi lines.🔔@aliaa08 #RanbirKapoor pic.twitter.com/qUN0HG2O7b
आलिया भट्ट म्हणाली, 'मानवी भावनेपेक्षा जास्त शक्तिशाली काहीही नाही. त्यावेळी भाषेची आवश्यकता नाही. माझ्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी इंडस्ट्रीतून झाली. यातून मला खूप प्रसिद्धी मिळाली. आपण भाषा किंवा सीमांमुळे विभागलेले असू शकतो, परंतु आपल्याला भाषा एकत्र आणते', असं आलिया म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या: