'आपका रेट क्या है' प्रसिद्ध गायिकेला थेट मंचावर सवाल, मोठी खळबळ, गायिकेने काढली पायातील चप्पल, थेट..
Tv9 Marathi February 24, 2026 02:45 PM

गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. प्रेक्षक गाणी ऐकण्यात मग्न होते, सर्वच चांगले वातावरण होते, मैफिल रंगली होती. मात्र, यादरम्यान असे काही झाले की, थेट प्रसिद्ध अभिनेत्री चक्क आपल्या पायातील चप्पल काढून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर धावून गेली. यावेळी थेट गोंधळ उडाला. उपस्थित लोकांनी गायिकेला चप्पलने सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला. पण गायिकेचा राग काही कमी होत नाही. सूत्रसंचालकाने गायिकेला एक असा प्रश्न केला, त्यानंतर तिचा संताप वाढला आणि तिने थेट आपल्या पायातील चप्पल मारण्यास काढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने गायिकेला थेट तुझा रेट किती आहे हा प्रश्न विचारला. हा प्रश्न कानावर पडताच गायिकेने थेट आपल्या पायातील चप्पल मारण्यास काढली. यावेळी काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही केला.

ही घटना बिहारमधील सारण जिल्ह्यात घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच वातावरण बिघडले. सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीवरप्रसिद्ध गायिका निशा उपाध्याय अचानक संतापल्या. त्यानंतर त्यांनी पायातील चप्पल काढली आणि थेट त्याला मारण्यासाठी गेल्या. कार्यक्रम सुरू असताना अचानक सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने गुपचूपमध्ये गायिकेला विचारले की, तुझा रेट काय आहे…

हे वाक्य कानावर पडताच गायिकेने थेट आपल्या पायातील चप्पल मारण्यास काढली. उपस्थित लोकांना नक्की काय घडले हे अजिबात समजले नाही. गायिका सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर धावून जात असल्याचे लक्षात येताच लोकांना गायिकेचा हात पकडला. यानंतरही गायिका जोरजोरात त्याला ओरडताना दिसली.

भोजपुरी सिंगर निशा उपाध्याय ने भरे मंच पर एंकर को चप्पल मार दी। आरोप है कि एंकर निशा उपाध्याय का रेट बता रहा था। भोजपुरी स्टेज शो आजकल सॉफ्ट पोर्न में बदल गया है, जहाँ फूहड़ता की सारी हदें पार की जा रही हैं। सरकार डीजे बंद कर रही है, लेकिन अश्लील और फूहड़ स्टेज शो पर कुछ नहीं बोल… pic.twitter.com/TL3CHGrQLf

— The Bihar (@thebiharoffice)

यानंतर निशा थेट मंच सोडून जातानाही दिसली. पण उपस्थित लोकांनी हे करण्यापासून तिला रोखले. अनेकजण गायिकेची समजूत काढताना दिसले. लोक आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत असून गायिकेने योग्यच केल्याचे अनेकांनी थेट म्हटले आहे. असा प्रश्न विचारल्यावर कोणीही हेच करेल, असे त्यांनी म्हटले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.