एकदिवसीय विश्वकरंडक विजेता भारतीय महिला क्रिकेट संघ विजेतेपदानंतर आज (२४ फेब्रुवारी) पहिला एकदिवसीय सामना खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे.
गतवर्षात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आणले होते. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-२० मालिका जिंकलेली असल्यामुळे भारताचे पारडे जड आहे. ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू अलिसा हिली या मालिकेतून पुनरागमन करणार आहे.
AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदलमात्र या एकदिवसीय मालिकेनंतर होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यातून ती आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त होणार आहे. हा एकमेव कसोटी सामना ६ मार्चपासून पर्थ येथे सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया संघात अलेना किंग हिचा समावेश करण्यात आला आहे. टी-२० मालिकेसाठी तिला वगळण्यात आले होते.
भारतीय संघात काही बदल झाले आहेत. टी-२० मालिकेत खेळलेल्या अरुंधती रेड्डी, भारती फुलमणी आणि श्रेयांका पाटील यांच्याऐवजी काशवी गौतम, हर्लिन देओल आणि प्रतीका रावल यांचा समावेश करण्यात आला आहे.
विश्वकरंडक स्पर्धेत प्रतीका रावलच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ती स्पर्धेबाहेर गेली होती. त्यानंतर ती पुनरागमन करीत आहे. मात्र विश्वकरंडक स्पर्धेत प्रतीकाऐवजी संधी मिळाल्यानंतर अंतिम सामन्यात निर्णायक खेळी करून आपले स्थान पक्के करणाऱ्या शेफाली वर्माला आज अंतिम संघात स्थान दिले जाते का, याबाबत उत्सुकता असेल.
फलंदाजीत भारताची मदार पुन्हा एकदा स्मृती मानधनावर आहे. टी-२० मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात स्मृतीने ८२ धावांची बहुमोल खेळी केली होती. ऑस्ट्रेलियात फलंदाजी करण्याचा आनंद वेगळाच असतो. महिलांच्या जागतिक क्रिकेटमध्ये आम्ही दरारा निर्माण करण्याच्या स्थितीत आहोत, असे स्मृतीने सांगितले.
या एकदिवसीय मालिकेत जेमिमा रॉड्रिग्जच्या फलंदाजीवरही लक्ष असणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य सामन्यात जेमिमाने १२७ धावांची अनन्यसाधारण खेळी करून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सनसनाटी विजय मिळवून दिला होता. अशा प्रकारच्या फलंदाजीची आता जेमिमाकडून अपेक्षा असेल.
IND vs AUS: जेमिमाह रोड्रिग्सचं विक्रमी अर्धशतक, मानधना-हरमनप्रीतच्या पंक्तीत स्थान; एलिस पेरीचाही विश्वविक्रम ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारतीय महिला वनडे मालिका (वेळ - स. ९ वाजता)पहिला वनडे सामना - २४ फेब्रुवारी, ब्रिस्बेन
दुसरा वनडे सामना - २७ फेब्रुवारी, होबार्ट
तिसरा वनडे सामना - १ मार्च, होबार्ट
या मालिकेतील सामने भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर, जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहाता येणार आहे.