पुस्तक बाजारातून मागे, न्यायव्यवस्थेचा पूर्ण आदर…केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एनसीईआरटी वादावर दिलगिरी
Tv9 Marathi February 27, 2026 02:46 AM

सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता ८ वीच्या सोशल सायन्सच्या पुस्तकातील धड्यावरुन आक्षेप घेतल्यानंतर केंद्र सरकारने आता हा धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यात न्यायालयातील भ्रष्टाचाराचा उल्लेख केला होता. NCERT ने बुधवारी या संदर्भात या पुस्तकाचे वितरण थांबवण्यात आले आहे. हा धडा चुकीने आला असून त्यासाठी केंद्र सरकारने माफी मागितले आहे. या प्रकरणाबाबत माहिती देताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेवर दिलगिरी व्यक्त केली आणि न्यायालयाचा सन्मान करणे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्यासंदर्भातील आपली बांधिलकी स्पष्टपणे सांगितली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की आम्ही ज्युडिशरीचा संपूर्ण सन्मान करत आहोत.ज्युडिशरीने जे काही सांगितले,त्याचे आम्ही संपूर्ण पालन करु, जे काही झाले आहे. त्यामुळे आम्ही खुप दु:खी आहोत आणि मी यावर दिलगिरी व्यक्त करीत आहे.

ते म्हणाले की जसे हे प्रकरण आमच्या ध्यानात आले,मी लागलीच NCERT शी संबंधित पुस्तकाला मागे घेण्याचे निर्देश दिले असून त्याचे वितरण थांबवले आहे. या पुस्तकांना मागे घेण्यासंदर्भात आवश्यक पावले उचललेले आहे.

NCERT च्या पाठ्य पुस्तकावर वाद

क्लास ८ वीच्या टेक्स्टबुकमध्ये म्हटले आहे की भ्रष्टाचार, केसेसचा मोठा बॅकलॉग आणि जजेसची योग्य संख्येच्या कमतरतेमुळे न्यायव्यवस्थेसमोर येणारी आव्हान यापैकी आहे.

यानंतर मुख्य न्यायाधीशांनी यावर म्हटले की, ‘मी पृथ्वीवरील कोणलाही इन्स्टीट्युशनच्या इमानदारीवर डाग लावणे आणि इन्स्टीट्यूशनला बदनाम करण्याची परवानगी देणार नाही. कोणत्याही किंमतीवर मी याची परवानगी देणार नाही. मग तो कितीही सर्वोच्च का असेना,कायदा आपले काम करेल. मला माहिती आहे याच्याशी कसे निपटायचे आहे.’

चुकीबद्दल NCERT चीही दिलगिरी

नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च एण्ड ट्रेनिंगने सांगितले की २४ फेब्रुवारी रोजी क्लास ८ वीच्या सोशल सायन्सच्या टेक्स्टबुक एक्सप्लोरिंग सोसायटी : इंडिया एण्ड बियॉन्ड, Vol II प्रकाशित झाल्यानंतर हे आढळले की चॅप्टर ४, ज्याचे टायटल आपल्या समाजातील ज्युडिशरीची भूमिका होते, यात चुकीचे मटेरियल आणि निवडण्याच्या निर्णयात चुक झाली होती.

NCERT ने चुकीचे मटेरियलचा समावेश करण्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. आणि सांगितले की अजाणतेपणी हे झाले आहे.या धड्याला योग्य अथॉरिटीच्या सल्ल्यानंतर पुन्हा लिहिण्यात येईल आणि बदललेले व्हर्जन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी साल २०२६-२७ शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपासून उपलब्ध होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.