छत्रपती संभाजीनगर : पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीप्रकरणी काही तांत्रिक कारणांमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
याचिकाकर्त्याने मूळ अर्जात दुरुस्तीसाठी किरकोळ अर्ज सादर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संदीपकुमार मोरे व न्या. आबासाहेब शिंदे यांच्यासमोर ॲड. प्रकाश आंबेडकर मृताच्या आईच्यावतीने युक्तिवाद करण्यासाठी हजर होते.
शासनाच्यावतीने अर्जदाराच्या दुरुस्ती अर्जावर म्हणणे सादर करण्यात येणार आहे. दुरुस्ती अर्ज प्रलंबित असल्याने मूळ प्रकरण ऐकता येणार नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले.
Nashik Land Scam : नाशिक हादरले! ६२ एकर शासकीय जमिनीची फाईलच गायब; बड्या बिल्डरांसह महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हाचार मार्चला सुनावणी अपेक्षित आहे. शासनाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील पवन लखोटिया यांनी बाजू मांडली.