चिपळूणमध्ये आजपासून कोकण विभागीय काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत कोकण विभागीय काँग्रेस
चिपळूण येथील धवल प्लाझा येथे शिबिराचं आयोजन
उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली तयारी पूर्ण
तीन दिवस चालणाऱ्या शिबिरात संघटनात्मक कामकाज व पक्षाच्या धोरणांवर मार्गदर्शन केले जाणार
Nashik: मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमधून ग्रंथ दिंडीमराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमधून ग्रंथ दिंडी
महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे करण्यात आले पूजन
ग्रंथ दिंडीसाठी विविध मान्यवर उपस्थित
ग्रंथ दिंडीत पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी आणि नागरिक सहभागी
ढोल ताशांच्या गजरात निघाली ग्रंथ दिंडी
हातात काळ मृदुंग घेत वारकरी आणि विठ्ठलाच्या वेशभूषेत बाळ गोपाळ देखील ग्रंथ दिंडीत सहभागी
Pune: पुणे महापालिकेचा बांधकाम व्यावसायिकांना इशारापुणे महापालिकेचा बांधकाम व्यावसायिकांना इशारा
बांधकामामधून धूळ मोठ्या प्रमाणावर येत असेल आणि जर उपाय योजना केल्या नाहीत तर होणार कारवाई
पुणे महापालिकेकडून पाठवण्यात येत येणार नोटिसा
पुण्यात हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढल आहे
महापालिका आयुक्त यांचा थेट कारवाई करण्याचा इशारा
अनेक बांधकाम व्यावसायिक धूळ रोखण्यासाठी उपाय योजना करत नसल्याचं समोर
Columbia: कोलंबियातील निवडणुकीचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांची निवडसोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. कोलंबिया देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय शिष्ट मंडळ 6 मार्च ते 10 मार्च दरम्यान कोलंबियांमध्ये असणार आहे. ८ मार्च रोजी कोलंबियांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जागतिक स्तरावर निवडणूक व्यवस्थापनातील पद्धतीचे परीक्षण करण्यासाठी हे पाच सदस्यीय शिष्टमंडळ जाणार आहे.
Purandar: किल्ले पुरंदर परिसरात 4 मार्च रोजी प्रवेशबंदीकिल्ले पुरंदर परिसरात 4 मार्च रोजी प्रवेशबंदी
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदरवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची होते गर्दी
अनियंत्रित गर्दीमुळे नैसर्गिक संपत्तीला आणि पोचू नये आणि सुरक्षा व्यवस्थेवर्तन येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 4 मार्च रोजी किल्ले पुरंदर परिसरात प्रवेश बंदी
या दिवशी बेकायदेशीररित्या किल्ले परिसरात कोणी आढळले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार
नागरिक आणि पर्यटकांनी सूचनांचं पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन
Pandharpur: पंढरपूर नगरपालिकेकडे साडे सहा कोटी रूपयांची थकबाकीपंढरपूर नगरपालिकडे जलसंपदा विभागाची साडेसहा कोटी रूपयांची थकबाकी आहे.थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागाने तगादा लावला आहे. येत्या सात दिवसांत थकबाकी भरा अन्यथा पाणी पुरवठा बंद केला जाईल अशी नोटीस दिली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पंढरपूरकरांवर पाणी टंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
पालिकेने तत्काळ पाणी भरून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पाणीपुरवठा समितीचे माजी सभापती विक्रम शिरसाट यांनी केली आहे. दरम्यान आज होणाऱ्या पालिकेच्या जनरल मिटींगमध्ये पाणी पाणी प्रश्नावरून नगराध्यक्ष प्रणिता भालके यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाण्याची शक्यता आहे.
नमाज पठण प्रकाराची मालेगाव महापालिकेकडून गंभीर दखलनमाज पठण प्रकाराची मालेगाव महापालिका कडून गंभीर दखल
विद्युत अभियंता अभिजित पवार यांचे निलंबन
विद्युत विभागाच्या कार्यालयात नमाज पठण झाल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर शहरात त्याचे पडसाद उमटले होते
विभाग प्रमुख म्हणून अत्यंत बेजबदार वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.
उमरगा व लोहारा तालुक्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासाधाराशिव जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच मोठ नुकसान झाल होत यामध्ये उमरगा व लोहारा तालुक्यातील तब्बल ३८ हजार शेतकऱ्यांचे ४१ कोटी रुपये अनुदान हे रखडले होते.अखेर या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.ऐन हंगामात खात्यात पैसे जमा होवु लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.२०२४ मध्ये दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी होवुनही प्रशासकीय पातळीवर प्रस्ताव नाकारला होता त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर याला यश आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Sangamner: संगमनेरमध्ये लाँगमार्चचा आज चौथा दिवसराजुर ते अहिल्यानगर निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस असून आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी शासकीय पातळीवर देखील हालचालींना वेग आला आहे.. संगमनेर तालुक्यातील निझर्नेश्वर या ठिकाणी आंदोलक मुक्कामी होते.. आज या ठिकाणाहून हे लाल वादळ थेट पालकमंत्री विखे पाटील यांच्या लोणी गावाकडे कुच करणार आहे.. मात्र त्यापूर्वी शासकीय पातळीवर देखील हालचालींना वेग आला असून शिष्टमंडळाबरोबर अधिकारी चर्चा करणार आहेत.. चर्चेनंतरच नेमकं या आंदोलनात तोडगा निघतो की आंदोलन पुढच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार हे स्पष्ट होईल..
Nashik: कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवातकुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पण त्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं होणार उद्घाटन
दुपारी मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांसह मंत्री उदय सामंत, छगन भुजबळ आणि अन्य मंत्री उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित
थोड्याच वेळात कुसुमाग्रज प्रतिष्ठान पासून ग्रंथदिंडीला होणार सुरुवात
देश-विदेशातील मराठी भाषिक संमेलनात होणार सहभाग
नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात संमेलनासाठी भव्य मंडपाची उभारणी
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड १३ मार्चलाजिल्हा परिषद अध्यक्षांची निवड २० मार्च आत करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.या निवडीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी १३ मार्च ही बैठकीची तारीख निश्चित केली आहे.तर आठ पंचायत समिती सभापती,उपसभापती निवडी सहा मार्चला होणार आहे.त्यासाठी आठ पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Barshi: बार्शी तालुक्यात जुन्या वादातून गोळीबार, एक जण गंभीर जखमीबार्शी तालुक्यात जुन्या वादातून गोळीबार, एक जण गंभीर जखमी.
बार्शी तालुक्यातील कुसळंब गावातील प्रकार.
पुण्यातून आलेल्या तीन ते चार युवकांनी एक जणाला बेदम मारहाण करत केला गोळीबार
मारहाण केल्यानंतर तीन ते चार युवक पुण्याच्या दिशेने झाले फरार..
सदर जखमी युवकाला बार्शी येथील खाजगी रुग्णालयात केलं भरती
बार्शी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल..
Pune: पुणे ते बँकॉक विमान सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंदपुणे ते बँकॉक विमान सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद असणार
उन्हाळी वेळापत्रकात पुणे बँकॉक आणि बँकॉक टू पुणे दोन्ही उड्डाणे तात्पुरती बंद
29 मार्च 2026 पासून सुरू होत आहे उन्हाळी वेळापत्रक त्यात दोन्ही सेवा बंद करण्यात आल्याची माहिती
इंडिको विमान कंपनीने ही सेवा बंद केल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासाला याचा फटका बसणार आहे
Pune: ई समर्थ पोर्टलमुळे थांबलेला निधी पुणे जिल्ह्यातील आमदारांना अर्थ खात्याकडून मंजूरई समर्थ पोर्टलमुळे थांबलेला निधी पुणे जिल्ह्यातील आमदारांना अर्थ खात्याकडून मंजूर
स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या निधीची फाईल अखेर आर्थिक त्यांनी मंजूर केली आहे
पुणे जिल्ह्यातील 24 आमदारांना आता स्थानिक निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
पुणे जिल्ह्यात ई समर्थ पोर्टल द्वारे निधी देण्याचा प्रायोगिक प्रयोग करण्यात येत आहे त्यामुळे हा निधी थांबला होता
पहिल्या टप्प्यात अर्थ खात्याने 50 कोटीचा निधीही ई समर्थ पोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे
बुलढाण्यात थरारक घटना; सख्ख्या भावाची हत्या करून मृतदेह जाळला...जिल्ह्यातील राहुड येथे सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोशन संजय इंगळे, वय 36, याने खामगावातील रवी देवीदास राऊत यांच्या मदतीने धाकटा भाऊ चेतन इंगळे, वय 35, याचा खून केल्याची कबुली दिली आहे. २५ फेब्रुवारी रोजी स्वतःच्या शेतात लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लाकडांवर जाळून राख व अस्थी नदीत फेकण्यात आल्या. चेतन बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली असून हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे...या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे...
तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत...मावळच्या तळेगाव दाभाडे येथील सिल्वर विंग अपार्टमेंट परिसरात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली होती.
पुणे स्टेशनवर ४ नवीन लिफ्ट सुरू, आता जिने चढण्याचं टेन्शन मिटलंप्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या चार नवीन लिफ्ट सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना फलाटवर ये-जा करणे आता अधिक सोयीचे झाल
दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज करण्याचे आवाहनप्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत असून आकर्षक तसेच पसंतीचे नोंदणी क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित शुल्क भरून अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक वाहनधारकांनी दि. 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक असून अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.
पुण्यात जुन्या वाहनांना प्रवेश बंदी ? राज्य सरकारकडे प्रस्ताव,सात लाखांहून अधिक वाहनांना लागणार ब्रेकशहरातील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन मोठा निर्णय घेणार आहे. १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना पुण्यात प्रवेश बंदी केली जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविणार आहेत.त्याला मंजुरी मिळाल्यास सुमारे सात लाखांहून अधिक वाहनांना पुण्यात धावता येणार नाही.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पुण्यात सहा लाख ८३ हजार ४११ खासगी संवर्गातील, तर ४६ हजार २८४ परिवहन संवर्गातील वाहनांचे आयुर्मान १५ वर्षांहून अधिक आहे. यात सर्वाधिक दुचाकी आहेत. दुचाकींची संख्या पाच लाख १२ हजार ५७५ आहे.