Gen Z: 'जेन झी'ची संवादासाठी मराठीला पसंती; सोशल मीडियावर इमोजी, शॉर्टफॉर्मला बोलीभाषेची टक्कर
esakal February 28, 2026 04:45 AM

नागपूर : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला असला तरी दररोजच्या संवादात आजची तरुण पिढी मराठी भाषेचा किती वापर करते, या विषयावर ‘सकाळ’ने एक सर्वे केला. त्यात समोर आले आहे की ‘जेन झी’पिढीतील तरुणाई संवादासाठी मराठी भाषा वापरत असली, तरी सोशल मीडियावर मात्र इमोजी आणि शॉर्ट फॉर्मचा वापर जास्त प्रमाणात करतात.

त्यांच्या सोशल मीडिया संवादात भाषेची जागा इमोजी आणि शॉर्टफॉर्मने घेतली आहे. सोशल मीडियावर ‘सकाळ’ने केलेल्या एका सर्वेनुसार आजची तरुण पिढी बोली भाषेत मराठीचा वापर सर्वाधिक करते. त्यापाठोपाठ हिंदी आणि इतर भाषांचा वापर होतो. सोशल मीडिया अकाऊंटवर ५० टक्के इंग्रजीत संभाषण, ३८ टक्के तरुण मराठीत तर १२ टक्के तरुण हिंदीत संवाद साधतात.

Premium|Travel Planning: पर्यटनाचं नियोजन: जगभरातील आकर्षक स्थळांची सफर

जास्तीत जास्त तरुण शॉर्टफॉर्मचा वापरत असल्याचे सर्वेतून पुढे आले आहे. या संवादामुळे अनेक नवीन शब्द पुढे आले आहेत. जसे गुडनाईट लिहिताना फक्त जीएन वापरले जाते. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर लिहिताना बीएफएफ लिहिले जाते. असे अनेक शॉर्टफॉर्म जेन झीने तयार केले आहेत. सोशल मीडियावरील संवादात या शॉर्टफॉर्मचा वापर सर्वात जास्त होतो. त्यापेक्षाही १०० टक्के तरुणांनी इमोजीचा वापर करत असल्याचे सांगितले आहे. संवादात भाषेऐवजी इमोजी टाकले की समोरच्याला त्यातून अचूक अर्थ काढतात. त्यामुळे खूप काही लिहित बसावे लागत नाही आणि फक्त एक इमोजी भावना व्यक्त करून जातो. त्यामुळे ‘जेन झी’ची सोशल मीडियावरील संवादाची भाषा आता शॉर्टफॉर्म आणि इमोजीने घेतली असल्याचे दिसते.

सोशल मीडियामुळे प्रचलित झालेले नवीन शब्द

  • एचओएन - हनी - जिव्हाळा दाखवण्यासाठी

  • बीआरओ - ब्रदर - जवळचा मित्र

  • एसआयएस - सिस्टर - जवळची मैत्रीण

  • डीयूडीई - अनौपचारिकरित्या व्यक्तीला संबोधणे

  • क्रश - एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण असणे

  • फ्लेक्स करणे - स्वतःची संपत्ती दाखवून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे

  • सॅव्हेज - परखड, बिनधास्त आणि कधी कधी टोचून बोलणारा

  • क्रिंज - एखाद्या गोष्टीमुळे अस्वस्थ वाटणे

  • एफओएमओ - फिअर ऑफ मिसिंग आउट - एखादी संधी किंवा अनुभव चुकण्याची भीती

  • जीओएटी - ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम - एखाद्या क्षेत्रातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती

  • सिम्प - एखाद्यावर अतिप्रमाणात मोहित होऊन स्वतःचा स्वाभिमान कमी करणारी वागणूक करणारा

  • लो-की - कमी प्रमाणात / जाहीरपणे न दाखवता

  • हाय-की - उघडपणे / ठळकपणे

  • कॅन्सल कल्चर - सार्वजनिकरित्या विरोध करून एखाद्याला बहिष्कृत करणे

  • घोस्ट करणे - कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक संपर्क तोडणे

  • स्लाइड इन डीएम - सोशल मीडियावर खाजगी संदेशाद्वारे संवाद सुरू करणे

  • मूड - एखादी गोष्ट स्वतःच्या भावनांशी जुळणारी वाटणे

भावना व्यक्त करतात इमोजी

सोशल मीडियावर वापरण्यात येत असलेले इमोजी थेट भावना पोहोचवतात. स्पेशल वाटणे, हसता हसता डोळ्यातून खूप पाणी येणे, थोडे सॅड वाटणे, लाजता लाजता हसणे, सॅड फिलिंग, खूप टेंशन, एका डोळ्यातून पाणी असलेला इमोजी इमोशनल फिलिंग पोहोचल्या हे सांगण्यासाठी वापरले जातात. खूप आनंद, यम्मी, खूप प्रकारे धन्यवाद, हात जोडलेला इमोजी ज्याप्रमाणे मोठ्यांना नमस्कारासाठी वापरला जातो, त्याचप्रमाणे फ्रेंड्समध्ये खूप बोलणं झालंय, आता चूप रहा हे सांगण्यासाठी सुद्धा वापरला जातो.

Premium|Travel Planning: पर्यटनाचं नियोजन: जगभरातील आकर्षक स्थळांची सफर

‘जेन झी’कडून वापरले जाणारे शॉर्टफॉर्म

  • एएसएपी - अॅज सून अॅज पॉसिबल - शक्य तितक्या लवकर

  • ईओडी - एंड ऑफ डे - दिवसाच्या शेवटी

  • सीओडी - कॅश ऑन डिलिव्हरी - वस्तू मिळाल्यावर रोख देण्याची पद्धत

  • बीटीडब्ल्यू - बाय द वे - तसेच / मध्येच सांगायचे तर

  • डब्ल्यूआरयूडी - व्हॉट आर यू डुइंग? - तू काय करत आहेस?

  • बीएफएफ - बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर - कायमचे जिवलग मित्र

  • पीओव्ही - पॉइंट ऑफ व्ह्यू - दृष्टिकोन

  • एफओएमओ - फिअर ऑफ मिसिंग आउट - काहीतरी चुकल्याची भीती

  • जीओएटी - ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम - सर्वात श्रेष्ठ

  • एलओएल - लाफिंग आऊट लाउड - मोठ्याने हसणे

  • ओएमजी - ओह माय गॉड - अरे देवा!

  • टीबीएच - टू बी ऑनेस्ट - खरं सांगायचं तर

  • आयडीके - आय डोन्ट नो - मला माहिती नाही

  • बीआरबी - बी राईट बॅक - लगेच परत येतो

  • टीटीवायएल - टॉक टू यू लेटर - नंतर बोलू

  • एफवायआय - फॉर युवर इन्फॉर्मेशन - तुमच्या माहितीसाठी

  • डीएम - डायरेक्ट मेसेज - खाजगी संदेश

  • जीएन - गुड नाईट - शुभ रात्री

  • जीएम - गुड मॉर्निंग - शुभ सकाळ

  • केकेए - काय करत आहे

  • टीपी - टाईम पास

  • बीएचए - बोर होत आहे

  • केएन - काही नाही

  • केपी - काही पण

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.