तिवसा : कर्जमाफीसह इतर मागण्यांच्या आठवणीसाठी २८ फेब्रुवारी रोजी तिवसा प्रहारकडून रक्तदान शिबिर राबविण्यात येईल. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावाने शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले पत्र पाठवून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर महायुती सरकारने कर्जमाफीसह इतर मागण्या मंजूर करण्याबाबत निर्णय घेतला होता. पुन्हा कर्जमाफीच्या आठवणीसाठी हे अनोखे आंदोलन करणार असल्याचे यावेळी प्रहारचे संजय देशमुख यांनी सांगितले.
यामध्ये आठवण हमीभावाची, भावांतर योजनेची, आठवण नुकसानभरपाईची, आठवण वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची, विधानसभा निवडणुकीत मतांचा जोगावा मागतांना शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या अनेक घटकांतील नेत्यांनी केली होती.
त्यांच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी महायुतीला भरभरून मतदान दिले व सत्तेत देखील बसविले. त्यांच्या या घोषणेची आठवण म्हणून २८ फेब्रुवारी रोजी मोझरी येथील जुने आयुर्वेदिक रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहोया अनोख्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संजय देशमुख, योगेश लोखंडे, सुरेंद्र भिवगडे, योगेश भुसारी, दिलीप घुरडे, विशाल ठाकूर, अंकुश राऊत, मुरली मदणकर, सुधीर वानखडे, मंगेश धोटे, दत्ता धस्कट, सचिन साव, श्रीकृष्ण पाटील, मोहन गोरडे, पंकज चौधरी, मनोज काळमेघ, बाळा देशमुख, अतुल चिंतारे, रोशन खोब्रागडे, प्रशांत राऊत, सतीश गावंडे, साहेबराव फटिंग, कपिल उमप, हेमंत तायडे, अंकुश गायकवाड, मोहन आवारे, मनोज गाडे, रामभाऊ चांदूरकर यांनी केले आहे.