टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला पराभवाचा झटका देत सेमी फायनलमध्ये धडक दिली. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग तिसरी तर एकूण सहावा वेळ ठरली. तर टीम इंडिया विरूद्धच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजचं स्पर्धेतून बाजार उठला. टीम इंडियासाठी हा विजय फार खास ठरला. टीम इंडियाने या विजयासह वेस्ट इंडिजचा टप्प्यात कार्यक्रम करत एक जुना हिशोब चुकता केला आहे. टीम इंडियाने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.