तिरुपती
तिरुपती जिल्ह्यातील दामिनेडू येथे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी रविवारी 16 नवीन न्यायालयीन संकुलांची पायाभरणी केली. सरन्यायाधीशांनी भूमिपूजन समारंभात भाग घेत पायाभरणी फलकाचे अनावरण केले. आंध्रप्रदेश पोलिसांनी त्यांना या कार्यक्रमात गार्ड ऑफ ऑनर दिला. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती धीरजसिंह ठाकूर, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. एस. नरसिंह, प्रशांत कुमार मिश्रा, एस. व्ही. एन. भट्टी आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.