वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे कोरोनरी आर्टरी डिसीज हा अनेकांच्या जीवाला धोका! ही 'लक्षणे' दिसताच उपचार घ्या
Marathi March 02, 2026 03:25 AM

हृदयाचे आरोग्य कशामुळे बिघडते?
हार्ट ब्लॉकेजची कारणे?
रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर लक्षणे?

मानवी शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदय निरोगी आणि सक्रिय ठेवणे खूप महत्वाचे आहे. पण जर हृदय थांबले तर संपूर्ण शरीर बंद होण्याची शक्यता जास्त असते. हृदयाच्या आरोग्याला इजा होणार नाही याची नेहमी काळजी घ्या. हृदय शरीरात सतत रक्त पंप करत असते, ज्यामुळे संपूर्ण शरीराला योग्य ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि तुम्ही कायमचे निरोगी राहतात. पण शरीरातील बदल किंवा जीवनशैलीतील चुकांमुळे हृदयाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. पण हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आल्यास संपूर्ण शरीराला इजा होण्याची शक्यता असते. हृदयाच्या रक्तवाहिन्या अवरोधित झाल्याची स्थिती वैद्यकीयदृष्ट्या कोरोनरी धमनी रोग म्हणून ओळखली जाते. त्यामुळे, तुमच्या शरीरातही कोरोनरी आर्टरी डिसीजची लक्षणे दिसत असतील, तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केले पाहिजेत.(छायाचित्र सौजन्य – istock)

मूळव्याध मुळापासून नष्ट होईल! आतडे स्वच्छ करण्यासाठी 'हे' फायबरयुक्त पदार्थ नियमित खा, बद्धकोष्ठता दूर होईल

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, चरबी आणि इतर पदार्थ तयार होतात आणि ब्लॉक होतात. ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या न झाल्यामुळे हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्त प्रवाह कमी होतो. या गंभीर आरोग्य स्थितीमुळे कोणत्याही क्षणी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे आल्यानंतर शरीरात कोणकोणती लक्षणे दिसतात, याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

हार्ट ब्लॉक होण्याची कारणे:

हृदयातील रक्तवाहिन्या अवरोधित होण्याची अनेक भिन्न कारणे आहेत. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉलचा पिवळा चिकट थर साचल्यामुळे योग्य रक्तप्रवाह बिघडतो. ज्यामुळे प्रामुख्याने छातीत दुखणे किंवा दाब येतो. कधीकधी वेदना उजव्या हातावर, खांद्यावर, मान, जबड्यात किंवा पाठीवर पसरते. काहींना चालताना, पायऱ्या चढताना त्रास होतो. थोडे चालल्यानंतर, थकवा आणि अशक्तपणा लगेच जाणवतो. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर वेदना कमी झाल्यासारखे वाटते.

वारंवार श्वास लागणे, अति थकवा, चक्कर येणे, मळमळ, थंड घाम येणे आणि अस्वस्थता ही हृदयविकाराची गंभीर लक्षणे आहेत. हार्ट ब्लॉकेजनंतर हृदयाचे ठोके वाढतात किंवा अगदी अनियमित होतात. ही समस्या प्रामुख्याने महिलांमध्ये दिसून येते. मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. उच्च रक्तातील साखरेमुळे हृदयावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. अपचन, पाठदुखी, अस्वस्थता किंवा अशक्तपणा यावर विलंब न लावता ताबडतोब उपचार करावेत, अन्यथा कोणत्याही क्षणी हृदयविकाराचा झटका आणि मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.

रक्तवाहिन्या अवरोधित होण्याची कारणे?

उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणामुळे हृदयातील रक्तवाहिन्या अवरोधित होऊ शकतात. धुम्रपानामुळे रक्तवाहिन्यांच्या अस्तरांना गंभीर नुकसान होते. या प्रक्रियेमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतो आणि हृदयाचे आरोग्य बिघडते. शारीरिक हालचालींचा अभाव, असंतुलित आहार, जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न, मानसिक ताण इत्यादींमुळे हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी लिहिला आहे आणि कोणत्याही प्रकारचा इलाज असल्याचा दावा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.