ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मार्च 2026 | मंगळवार
एबीपी माझा ब्युरो March 03, 2026 08:43 PM

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मार्च 2026 | मंगळवार

1. रमजानच्या पवित्र महिन्यात इराण-इस्त्रायल युद्ध भडकणं दुर्दैवी, भारताकडून भूमिका स्पष्ट, आखाती प्रदेशातील एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर https://tinyurl.com/4r8f7xn3 इराणची राजधानी तेहरानमधले सर्व सीसीटीव्ही इस्रायलकडून हॅक, अनेक वर्षांपासून चौकाचौकात वॉच, सीसीटीव्हीद्वारे खामेनींची होती इस्रायलला खडानखडा माहिती, ब्रिटीश मीडियाचा धक्कादायक दावा https://tinyurl.com/yhtdbhuh इस्रायलकडून तेहरान-बैरूतवर हवाई हल्ले, इराणमध्ये 742 जणांचा मृत्यू, 750 हून अधिक जखमी, युद्धाच्या चौथ्या दिवशी काय काय घडतंय? https://tinyurl.com/53ptu2x8 

2. युद्धात अडकलेल्या राज्यातील लोकांच्या सुटकेसाठी सरकारचा पुढाकार, हेल्पलाइन क्रमांक जारी केल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, तर गिरीश महाजनांकडे सोपवली समन्वयची जबाबदारी https://tinyurl.com/y3uxyf7n  दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था, फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमानांने नागरिक भारतात परतणार https://tinyurl.com/mpnkncvd 

3. मदत करा, माझा मुलगा कुवेतमध्ये अडकलाय, त्याला परत आणा, मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारांची आर्त हाक, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनाही साकडं https://tinyurl.com/mrxsdwup  दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त https://tinyurl.com/4z7hy5bv 

4. भाजपची राज्यसभेसाठी 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार, महाराष्ट्रातील नावं अद्याप गुलदस्त्यात https://tinyurl.com/4zmrre84 

5. मला रोज धमक्या येतात, कधीही घात होऊ शकतो, कुटुंबाचा जीवही धोक्यात, मनोज जरांगे पाटलांची चिंता, वर्षभर दौरे थांबवण्याचा निर्णय, या दरम्यान समाजासाठी नवीन यंत्रणा उभारण्याचा संकल्प  https://tinyurl.com/989esaub 

6. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, अंजली दमानियांनी केलेले कृषी साहित्य आणि खतांच्या खरेदीतील घोटाळ्याचे सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळले https://tinyurl.com/yc7en7n6  आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक आणि अविचारी कृतीमुळं विरोधात षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळतं, कुणालाही हिणवू नका, धनंजय मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन https://tinyurl.com/3nkptfcz 

7. अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं झालेलं नुकसान दिसलं असतं, एएआयबीच्या अहवालावर मंत्री छगन भुजबळांची शंका https://tinyurl.com/4rpv9zbt 

8. मोबाईल नं दिल्यानं 13 वर्षीय चिमुरड्याचं धक्कादायक कृत्य, खोलीला आतून कडी लावत साडीच्या सहायाने घेतला गळफास https://tinyurl.com/mrnc8dva धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले https://tinyurl.com/4fk9kdvc  तोंडाला मास्क बांधून तिघे आले, प्रेमी युगलाला मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने पळवले, बारामतीतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/5226kr2u 

9. चंद्रग्रहणामुळं राज्यातली प्रमुख मंदिरं दर्शनासाठी सकाळपासून बंद, साडे तीन शक्तीपीठं, अष्टविनायक,सिद्धीविनायक, दगडूशेठ, पंढरपूर मंदिर सायंकाळी खुले होणार https://www.youtube.com/shorts/ZdJRENOUWd0  ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. हमीद दाभोळकरांची मागणी https://tinyurl.com/2s4maxj3  

10. सूर्याच्या टीम इंडियाला चंद्राचं ग्रहण, खग्रास चंद्रग्रहणामुळे भारतीय संघाने वानखेडे स्टेडियमवर सराव करणं टाळल्याची चर्चा, तर इंग्लंडचा नियोजनाप्रमाणे सराव पूर्ण https://tinyurl.com/yttrxv7d  इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार, वानखेडेवर गुरुवारी हाय-व्होल्टेज सेमीफायनल https://tinyurl.com/mryej94m 

एबीपी माझा स्पेशल

फायटर संजू , एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा विशेष लेख https://tinyurl.com/yc5t4etf 

युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका https://tinyurl.com/2x63ncyz 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.