T20 World Cup: भारतीय संघ वर्ल्ड कप फायनल खेळणार नाही, संजू सॅमसन खेळला म्हणून उपांत्य फेरीत पोहोचले, नाहीतर...
esakal March 04, 2026 01:45 AM

Amir controversial statement on Team India: पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर याने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार नाही, असा दावा करून तोंडावर आपटल्यानंतरही आमीरने आता एक नवा दावा केला आहे. भारतीय संघ फायनल खेळणार नाही, असे त्याचे म्हणणे आहे आणि आता त्याला सोशल मीडियावर नेटिझन्स झोडत आहेत. भारतीय संघाने इडन गार्डनवर वेस्ट इंडिजवर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतरही आमीरला ट्रोल केले गेले.

वेस्ट इंडिजच्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनने नाबाद ९७ धावा करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचा हा सर्वात मोठ्या लक्षाचा यशस्वी पाठलाग ठरला. तरीही भारताच्या या विजयावर आमीर फार आनंदी नाही. तो म्हणाला, भारतीय संघ पूर्ण ताकदीने क्रिकेट खेळत नाही. भारतीय संघ फायनल नाही खेळणार.

Rohit Sharma-Sanju Samson: 'दु:खी मत हो भाई...', T20 WC च्या पहिल्याच दिवशी रोहितने संजूला मिठी मारत काय सांगितलं होतं?; Video

त्याने सॅमसनच्या खेळीचे कौतुक केले, पण अडचणी अजूनही आहेत, असे तो म्हणाला. "माझे उपांत्य फेरीचे विश्लेषण बरोबर होते. संजू सॅमसनने खरोखरच चांगले क्रिकेट खेळले. तरीही, मला वाटते की भारत अद्याप पूर्ण क्रिकेट खेळत नाही, जसप्रीत बुमराह वगळता, एकही गोलंदाज फॉर्ममध्ये नाही. त्यांची फलंदाजी पाहा, जवळजवळ प्रत्येक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल अशीच चिन्ही होती. इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना चांगला असेल, परंतु मला खात्री आहे की भारत अंतिम सामना खेळणार नाही."

जेसन होल्डर आणि रोवमन पॉवेल यांच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने १९५/४ धावा केल्या होत्या. बुमराह पुन्हा एकदा भारताचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला, त्याने ३६ धावांत २ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ४१ धावांवर २ विकेट्स गमावल्या. पण, सॅमसनने दबाव सहन केला, भागीदारी जोडल्या आणि नाबाद राहिला.

IND vs ENG Semi: भारत-इंग्लंड सामना काही कारणास्तव झालाच नाही, तर काय होईल? फायनलला कोण जाईल? राखीव दिवसाचा नियम

त्याचा नाबाद ९७ धावा या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात यशस्वी पाठलाग करताना भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावसंख्या आहे. संजूने २०१६ आणि २०२२ मध्ये विराट कोहलीच्या नाबाद ८२ धावांच्या धावसंख्येला मागे टाकले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.