नागपूर : सेंट उर्सुला केंद्रावर बारावी रसायनशास्त्राचा पेपर विद्यार्थिनीच्या मोबाइलवर आल्याने एकच खळबळ उडाली होती. बोर्डाच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर तपासात ८ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीमध्ये जयताळ्यातील विद्यासाधना कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेजमधील केंद्रावर चपराश्याच्या मदतीने आरोपी संदीप सरटकर याने पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अविनाश आडे (वय ३५) या चपराश्यालाही ताब्यात घेतले आहे. मुस्तफाच्या चौकशीत त्याच्या व्हॉट्सॲपवर गणिताचा पेपरही आला असल्याचे पुढे आले आहे. मुस्तफा याच्या शिकवणी वर्गात शिक्षक असलेला अल्ताफ गोडील याने परिचयात असलेला दिनेश कोटांगळे याला बारावीच्या विज्ञान शाखेतील विषयांचे पेपर मागितले. त्याने ‘एज्युकेशन ॲकॅडमी’चे संचालक मनीष शंभरकर याच्या माध्यमातून प्रदीप जांगडे याची भेट घेण्यास सांगितले. प्रदीप मुख्याध्यापक असल्याने त्याला संपर्क केला. त्यानंतर प्रदीपने दुसऱ्या दिवशी सकाळी अल्ताफला कॉल करून बोलावून घेतले. याभेटीत त्याला प्रश्न आणि एमसीक्यू दिले.
यानंतर २१ तारखेला त्याच्या मोबाइलवर गणिताचा पेपर आणि त्याची उत्तरेही पाठविली. प्रदीपने ही प्रश्नपत्रिका आणि उत्तर प्राथमिक शिक्षक असलेला संदीप सरटकर याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी अटक केली. संदीपची चौकशी केली असता, त्याने चपराशी अविनाश आडे याच्याबाबत माहिती दिली. याप्रकरणात आणखी काही जणांची नावे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
लाखोंची कमाईसंदीपकडून प्रदीप लोखंडे आणि त्यांच्या शिकवणी वर्गातील साथीदाराला बारावीच्या विज्ञान शाखेच्या विषयांचे पेपर व्हॉट्सॲपवर पाठवून लाखोंची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे केंद्रावरून पेपर फोडले आहेत काय, याची चौकशी पोलिसांकडून होणार आहे.
यानंतर २१ तारखेला त्याच्या मोबाइलवर गणिताचा पेपर आणि त्याची उत्तरेही पाठविली. प्रदीपने ही प्रश्नपत्रिका आणि उत्तर प्राथमिक शिक्षक असलेला संदीप सरटकर याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी अटक केली. संदीपची चौकशी केली असता, त्याने चपराशी अविनाश आडे याच्याबाबत माहिती दिली. याप्रकरणात आणखी काही जणांची नावे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
Latest Marathi News Live Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...लाखोंची कमाई
संदीपकडून प्रदीप लोखंडे आणि त्यांच्या शिकवणी वर्गातील साथीदाराला बारावीच्या विज्ञान शाखेच्या विषयांचे पेपर व्हॉट्सॲपवर पाठवून लाखोंची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे केंद्रावरून पेपर फोडले आहेत काय, याची चौकशी पोलिसांकडून होणार आहे.
असे फुटले पेपर
संदीपने चपराशी अविनाश आडे याला पैशाचे आमिष दाखवीत कटात सहभागी करून घेतले. शाळेच्या परिसरात असलेल्या परीक्षा केंद्रावर पेपरच्या पाऊण तास आधी पोहोचायचा. पेपर येताच सील फोडून पेपरचे फोटो घ्यायचा. त्यानंतर हे फोटो प्रदीपला व्हॉट्सॲपवरून पाठवत होता. आडे याला ताब्यात घेतल्यावर त्याने याबाबत खुलासा केला.
चौघांची कारागृहात रवानगी
दिनेश कोटांगळे, मनीष शंभरकर, प्रदीप जांगडे, संदीप सरटकर यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांचीही कारागृहात रवानगी केली.
आडे माफीचा साक्षीदार?
विद्यासाधना कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज परिसरातच चरणदास प्राथमिक शाळा असून तिथे संदीप सरटकर प्राथमिक शिक्षक आहे. त्याने येथील चपराशी अविनाश आडे याच्यासोबत संगणमत करीत त्याच्या मदतीने सर्व पेपर फोडल्याची माहिती समोर आली. आता त्याला पोलिसांकडून माफीचा साक्षीदार बनविले जाणार असल्याची माहिती आहे.