Viral Video: आश्चर्यकारक तपश्चर्या! होळीच्या धगधगत्या ज्वालांमध्ये तो थेट उतरला… पुढे जे घडलं ते पाहून सगळे थक्क
esakal March 04, 2026 01:45 AM

भारतभरात होळीचा सण रंगांच्या उधळणीसह उत्साहात साजरा होत असताना, उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील फालेन या छोट्याशा गावात एक अनोखा आणि रोमांचकारी विधी सर्वांचे लक्ष आकर्षित करत आहे. या गावात शतकानुशतके चालत आलेली एक परंपरा आहे, ज्यात भगवान विष्णूच्या भक्त प्रल्हादाचे प्रतीक म्हणून एक व्यक्ती थेट होळीच्या प्रचंड अग्निकुंडातून चालत जाते. हा दृश्य इतका अविश्वसनीय असतो की, उपस्थित दर्शकांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आणि ते स्तब्ध होऊन पाहत राहतात.

ही परंपरा प्रल्हादाच्या पौराणिक कथेवर आधारित आहे, ज्यात त्याच्या अढळ श्रद्धेने वाईट शक्तींवर विजय मिळवला होता. होलिका दहनाच्या आदल्या रात्री हा विधी पार पडतो. यात प्रल्हादाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला दैवी संरक्षण प्राप्त होत असल्याचे स्थानिकांचे मत आहे. फालेन गावातील ही रूढी देशातील सर्वांत प्राचीन मानली जाते आणि दरवर्षी हजारो भाविक या चमत्कारिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी येथे जमलेले असतात.

महत्त्वपूर्ण भूमिका

या वर्षी हा महत्त्वपूर्ण भूमिका संजू पांडा नावाच्या व्यक्तीने निभावली. त्यांनी या विधीसाठी कठोर साधना केली होती. गावकऱ्यांच्या मते, ही तयारी वसंत पंचमीपासूनच सुरू होते. तेव्हापासून निवडलेली व्यक्ती संसारापासून अलिप्त होऊन राहते. कुटुंबापासून दूर राहून, पूर्णपणे एकांतात वेळ व्यतीत करते आणि तब्बल ४५ दिवस काहीही अन्न ग्रहण करत नाही. या काळात केवळ आध्यात्मिक ध्यान, उपासना आणि शिस्तीचे कठोर पालन केले जाते. एएनआयशी बोलताना एका स्थानिकाने सांगितले की, ही प्रक्रिया होलिका दहनापर्यंत चालू राहते आणि शेवटी ती व्यक्ती अग्नीच्या ज्वालांमधून निर्भयपणे पार जाते.

Private Video Leak: पॉर्न सर्च करताना स्वतःचाच व्हिडिओ दिसला! हॉटेलमधील Hidden Camera मुळे व्हायरल झाले खासगी क्षण, कपल हादरलं

या विधीचे मूळ प्रल्हाद-होलिका कथेत आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, होलिका ही राक्षसी प्रल्हादाला आगीत घेऊन बसली, पण प्रल्हादाच्या भक्तीमुळे तो सुरक्षित राहिला आणि होलिका जळून खाक झाली. फालेनमधील ही परंपरा याच घटनेचे जिवंत स्मरण आहे, ज्यात भक्ती आणि श्रद्धेच्या सामर्थ्याने वाईटावर मात करण्याचा संदेश दिला जातो. हा विधी केवळ धार्मिक नाही, तर तो गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीकही आहे.

आध्यात्मिक रूप

होळी हा सण फालेनमध्ये आध्यात्मिक रूप घेतो. इतर ठिकाणी विविध विधी साजरे होतात, तरीही या गावातील ही रूढी तिच्या अनोख्या स्वरूपामुळे वेगळी ठरते. या वर्षी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला आहे. अनेक नेटिझन्सनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी याला श्रद्धेचा चमत्कार म्हटले आहे.

Viral Video : होळीच्या नावाखाली क्रूरता ! बैलगाडी ओढणाऱ्या गायीला हुल्लडबाजांनी पाजली दारू, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.