Sanju Samson latest ICC T20 rankings update: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीची दखल आयसीसीने घेतली आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा उपांत्य फेरीचा सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे, ५ मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ट्वेंटी-२०ची क्रमवारी जाहीर केली आहे.
भारत-वेस्ट इंडिज सामन्यात संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची मॅच विनिंग खेळी केली आणि भारताला उपांत्य फेरीत पोहोचवले. या खेळीचा संजूला आयसीसी क्रमवारीत खूप मोठा फायदा झाला आहे आणि त्याने २५ स्थानांची झेप घेताना फलंदाजांमध्ये ४०व्या क्रमांकावर पोहोचला आहे. खराब फॉर्माशी झगडणाऱ्या अभिषेक शर्माने त्याचे अव्वल स्थान कायम राखले असले तरी पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान त्याच्या जवळ पोहोचला आहे. अभिषेक ८७४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर साहिबजादा ८४८ गुणांपर्यंत पोहोचला आहे.
IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूजइंग्लंडच्या फिल सॉल्टची ( ८०३) तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. इशान किशन ( ७८३) पाचव्या स्थानावरून चौथ्यावर पोहोचला आहे, तर तिलक वर्माही ( ७४९) सहाव्या क्रमांकावर आला आहे. त्यानेही एका स्थानाची सुधारणा केली आहे, परंतु कर्णधार सूर्यकुमार यादव सातव्या क्रमांकावर घसरला आहे. गोलंदाजी विभागात भारताचा वरुण चक्रवर्थी ( ७७१) अव्वल स्थानी कायम आहे. पाकिस्तानचा अब्रार अहमद दोन स्थानांच्या सुधारणेसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान दुसऱ्या स्थानावर आहे.
जसप्रीत बुमराह एक स्थान वर सरकून सातव्या क्रमांकावर आला आहे. अर्शदीप सिंगने सहा स्थानांची झेप घेता १३वे क्रमांक पटकावले आहे. ट्वेंटी-२० अष्टपैलू खेळाडूंमध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा अव्वल आहे. भारताच्या हार्दिक पांड्याने एक स्थानाच्या सुधारणेसह दुसरे स्थान पटकावताना पाकिस्तानच्या सैम आयुबला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. शिवम दुबे मात्र दोन स्थान खाली सरकून नवव्या क्रमांकावर गेला आहे. अक्षर पटेलही दोन स्थान सरकून २०व्या क्रमांकावर घसरला आहे.
Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य