अशा मुलींमुळे बलात्कार होतात…, अभिनेत्रीच्या अर्धनग्न कपड्यांवर लोकप्रिय सेलिब्रिटीचं वादग्रस्त वक्तव्य
admin March 07, 2026 11:24 AM
[ad_1]
अशा मुलींमुळे बलात्कार होतात…, अभिनेत्रीच्या अर्धनग्न कपड्यांवर लोकप्रिय सेलिब्रिटीचं वादग्रस्त वक्तव्य

सोशल मीडिया आणि सिनेविश्वात कायम सेलिब्रिटींच्या फॅशन आणि स्टाइलबद्दल वाद सुरु असतात… नुकताच अभिनेत्री आणि स्प्लिट्सविलाची पूर्व स्पर्धक खुशी मुखर्जी पुन्हा तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. आता प्रकरण इतकं टोकाला गेलं की, अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. गायकाने अभिनेत्रीच्या कपड्यांचा विरोध केल्यानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. सांगायचं झालं तर, नुकताच, खुशी हिला मुंबईच्या रस्त्यांवर अर्धनग्न कपड्यांमध्ये स्पॉट करण्यात आलं. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे खुशी सतत स्वतःचे कपडे सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

गायक आणि रॅपर सँटी शर्मा याचं वादग्रस्त वक्तव्य (Rapper Controversial Statement On Khushi Mukherjee)

खुशी कपूर हिच्या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देत रॅपर सँटी शर्मा याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सँटी म्हणाला, अशा कपड्यांमुळे समाजावर वाईट परिणाम होता… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशा व्हिडीओंमुळे तरुण पिढीवर नकारात्मक परिणाम होतात. एवढंच नाही तर, इंटरनेटचा वापर आजच्या युगात मुलं देखील करतात… त्यामुळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी विचार केला पाहिजे… असं देखील रॅपर म्हणाला.

अशा मुलींमुळे होतात बलात्कार… – रॅपर सँटी शर्मा

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या व्हिडीओनंतर सँटी याने असं वक्तव्य केलं, ज्यामुळे वातावरण गरम झालं. सँटी म्हणाला, ‘अशा मुलींमुळेच बलात्कार होतात…’, रॅपर अशी टिप्पणी केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला… अनेक सोशल मीडिया युजर्सनी ते अत्यंत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील म्हटलं आहे.

सँटी शर्मा याच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत… काही लोकांनी सँटी शर्मा याच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे, तर अनेकांनी विरोध केला आहे. सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरील कंटेंटबाबत जबाबदारी असली पाहिजे… असं अनेकांनी म्हटलं आहे. तर काहींच्या म्हणण्यानुसार, महिलांच्या कपड्यांना गुन्ह्याशी जोडणे हे एक सदोष मानसिकता दर्शवतं. अनेक नेटकऱ्यांनी अशी देखील कमेंट केली आहे की, कोणत्याही प्रकारच्या हिंसाचार किंवा गुन्ह्यासाठी महिलांच्या कपड्यांना दोष देणे योग्य नाही…

या वादाबद्दल खुशी मुखर्जीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी तिच्या बोल्ड फॅशन निवडींमुळे तिला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. खुशीने यापूर्वी एका मुलाखतीत म्हटले होतं की, तिला तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी हॉलिवूडमधून प्रेरणा मिळते. तिने जेनिफर लोपेझ, पॅरिस हिल्टन आणि मॉडेल इरिना शेख सारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना स्वतःचं स्टाइल आयकॉन सांगितलं होतं.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.