Ladki Bahin Yojana: महिलांना आर्थिकदृष्ट्य सक्षम करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर १५०० रुपयांचा हप्ता २१०० रुपये करण्याची घोषणाही महायुती सरकारने केली होती. मात्र, लाडक्या बहिणींच्या हाती पुन्हा एकदा निराशा लागली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही २१०० रुपयांचा हप्ता मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे. एकल महिलांच्या कल्याणसाठी लवकरच धोरण आणण्यात येईल. तसेच २५ लाख दीदींना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहितीही त्यंनी दिली.
Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींची काळजी मिटणार ! एकनाथ शिंदेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'ही' मोठी घोषणामहत्त्वाचे म्हणजे यावेळी बोलताना त्यांनी २१०० रुपयांचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे महिलांना सध्यातरी १५०० रुपयांचाच हप्ता मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीनंतरचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. यावेळीही सरकारने २१०० रुपयांच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा केली नसल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे.