Yermala Accident : येरमाळा येथे भीषण अपघात; RTO टीमच्या गाडीची जखमींना उपचाराची मदत, ४ जणांचे वाचवले प्राण
esakal March 07, 2026 01:45 PM

येरमाळा - धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर आज एक भीषण अपघात झाला. मात्र, अपघातानंतर लोकांनी मदत करून जखमींना बाहेर काढूनही 108 आणि 102 ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) ४ गंभीर जखमींचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, येरमाळा शहराजवळ TATA punch या गाडीमधून छत्रपती संभाजी नगर येथील चार जण येरमाळामार्गे पंढरपूरकडे जात असताना येरमाळा केंद्राजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, वाहनाचा चक्काचूर झाला आणि प्रवासी शिवाजी बारीकराव गायकवाड (वय-७५) आत्माराम काशीनाथ हातोळे सरिता आत्माराम हातोळे (वय-५२) चालक सर्जेराव भाभीनाथ सोनवणे (वय-५०) एम.एच.ए. एम.४२७५ आत अडकून पडले होते.

त्यांना येरमाळा गावातील व रस्त्यावरील प्रवाशांनी गाडीच्या बाहेर काढले मात्र 102 व 108 ॲम्बुलन्स अर्धा तासाची प्रतीक्षा करूनही येत नसल्याने शेवटी. योगायोगाने याच मार्गावरून आरटीओचे पथक परिसरात दंडात्मक कारवाईच्या कर्तव्यावर असताना अपघाताचे गांभीर्य ओळखून आरटीओ अधिकारी मोटार वाहन निरीक्षक प्रसाद पवार आणि वाहन चालक देशमुख यांनी तात्काळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ४ प्रवाशांना येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून.

कोणतीही ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने शासकीय रुग्णालय धाराशिव येथे दाखल केले.

आरटीओ पथकाने याच वेळेत जखमींना जवळच्या रुग्णालयात प्रथममोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केली दाखल केले. या जखमींना वेळेवर उपचार मिळाल्याने तर मोठा अनर्थ टाळला. पथकाने केवळ मदतच केली नाही,तर रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचे काम केले.

सध्या या ४ जखमींवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आरटीओ पथकाच्या या दंडात्मक कारवाई सोडून धाडसी मदत आणि सामाजिक कार्य केल्याने येरमाळा पंचक्रोशीत सोशल मीडियावर मोठे नवल केले जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.