छत्रपती संभाजीनगर : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हजारो किलोमीटर दूर घर सोडून आलेल्या तरुण कामगाराचे स्वप्न समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात कायमचे थांबले. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच कामावर रुजू झालेल्या वीरेश्वर विश्वकर्मा यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
घाटीत आपल्या मुलाचा मृतदेह पाहताच उत्तर प्रदेशातून आलेल्या वडिलांनी एकच आक्रोश केला. यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (ता. सहा) तीन कामगारांवर काळाने घाला घातला.
Nagpur Amravati Highway Accident: नागपूर-अमरावती महामार्गावर; दुचाकी झाडावर आदळून दोघांचा मृत्यूउत्तर प्रदेश येथील वीरेश्वर विश्वकर्मा यांचाही मृत्यू झाला. वीरेश्वर हे अवघ्या दहा दिवसांपूर्वीच कामावर रुजू झाला होते. कुटुंबासाठी दोन पैसे कमविण्याच्या आशेने तो कामावर लागले. मात्र, नियतीने त्यांच्यावर क्रूर घाव घातला.
तसेच नायगाव येथील रहिवासी गणेश सांडू कसारे यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांपर्यंत पोचताच गावावर शोककळा पसरली. त्यांचे नातेवाइक घाटी रुग्णालयात पोचताच परिसरात हृदय पिळून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.
Air Ambulance Crash: पैसा, प्रार्थना, आशा सगळं पणाला लावलं… तरीही मृत्यूने झडप घातली, एअर अॅम्बुलन्स दुर्घटनेची काळीज पिळवटणारी A टू Z स्टोरी ज्ञानेश्वरच्या छातीत रक्तस्रावया अपघातात राम गोपाल पटेल (रा. मध्य प्रदेश), ज्ञानेश्वर घोरपडे (रा. पोखरी) आणि शैलेंद्र रॉय (रा. पश्चिम बंगाल) हे जखमी झाले. राम गोपाल पटेल हे जेसीपीमध्ये बसले होते. अपघातात त्यांच्या कानाला, डोळ्याला व नाकाला गंभीर मार लागला आहे. ज्ञानेश्वर घोरपडे यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या छातीत रक्तस्त्राव झाला आहे. जखमी शैलेंद्र सर्विस व्हॅनमध्ये होते.