1 कोटींची लाच मागणाऱ्या जीएसटीच्या 2 सहाय्यक आयुक्तांसह एकाला अटक करण्यात आलीये. नाशिकमध्ये ही कारवाई करण्यात आली, 20 लाखांचा पहिला हफ्ता स्वीकारताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सहाय्यक आयुक्त सोमनाथ पागे आणि मच्छिंद्र दोंदेसह एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आले.
कर्जमाफीची घोषणा अर्धवट, फसवी - रोहित पवारसरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची सरकारने केलेली घोषणा ही अर्धवट, शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आणि स्वतःच दिलेल्या शब्दापासून पळ काढणारी आहे. यंदा अतिवृष्टीमुळं संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः वाहून गेल्याने यंदाही कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये सरसकट समावेश करणं गरजेचं आहे. बजेटवर बोलताना ही बाब आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देऊ आणि सरसकट कर्जमाफी करण्यास सरकारला भाग पाडू..!
तटकरेंना बोलवलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या सदस्यांची दांडीसांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत राजकारण उफाळून आले आहे. अशातच भाजपवर नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर लावत खळबळ उडवून दिली आहे.
भूम, परंडा, वाशी पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता, तानाजी सावंतांची रणनीती यशस्वीमाजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी भूम परंडा वाशी या तीन तालुक्याच्या पंचायत समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सावंत यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आली आहे. या तिन्ही पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार सभापती म्हणून विजयी झाले आहेत