घोडेगावात सोमवारी 'महाराजस्व' शिबिर
esakal March 07, 2026 11:45 AM

घोडेगाव, ता. ६ ः आंबेगाव तालुका महसूल विभागामार्फत घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील मंडल स्तरावर सोमवारी (ता. ९) छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन केले आहे.
घोडेगाव, काळेवाडी- दरेकरवाडी, पिंपळगावतर्फे घोडा, शिनोली, गंगापूर बुद्रुक, आमोंडी, चिंचोली, गिरवली या भागातील गावे व वाड्या- वस्त्यांवरील महिला, विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी तहसीलदार सचिन वाघ यांनी केले आहे. येथील हरिश्चंद्र मंदिर गौरी शंकर सभामंडप येथे सोमवारी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शिबिर अभियान चालू राहणार आहे.
यावेळी मंडल अधिकारी व्यंकटेश भोसले, ग्राम महसूल अधिकारी सुनीता गवारी, संदीप म्हसकर, वैशाली डामसे, स्नेहल वळवी, दादाभाऊ जाधव, अजित लांडे, पवनकुमार शिवले उपस्थित राहणार आहेत.
महसूल विभागातील प्रलंबित फेरफार, सातबाऱ्यामधली चुकांची दुरूस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा आणि ८ अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, अकृशिक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे यांसह विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन
मंडल अधिकारी व्यंकटेश भोसले यांनी केले आहे.

महसूल विभाग अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी व महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारी सत्वर निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी आंबेगाव तालुक्यात प्रत्येक मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
- गोविंद शिंदे, प्रांत अधिकारी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.