Pune Crime News : पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका डिलिव्हरी बॉयकडून तरुणीची छेड काढण्यात आली आहे. 'तू खूप सुंदर दिसतेस' म्हणत पोर्टर अँपच्या डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग (Pune Crime News) करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपी CCTV कॅमेरात कैद झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Pune Shivajinagar Police Station) डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर कांबळे असे या संशयित आरोपीचं नाव असून त्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शिवाजीनगर पोलिसांकडून संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.
Pune Crime News : डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पाण्याची मागणी केली अन्...
मिळलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोर्टर ॲपवरून सामान बोलवले होते. हे सामान घेण्यासाठी तरुणीने दरवाजा उघडला आणि पार्सल घेतलं. मात्र त्यानंतर डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पाण्याची मागणी केली. तरुणीने डिलिव्हरी बॉयला पाणी दिले. यावेळी डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या हाताला स्पर्श केला आणि तिला खूप सुंदर दिसतेस, असं म्हटलं. दरम्यान 6 मार्चला संध्याकाळी पाच वाजता सुमारास हि घटना घडलीय. तरुणीच्या घरीच ही घटना घडली आहे. यावेळी तरुणीच बाळ आणि सासू घरात होते. घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला आणि त्यांनतर त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं.
Pune Shivajinagar Police Station: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल
सध्या या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲपमधील सगळे डिटेल्स पोलिसांना देण्यात आले असून तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीधर कांबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आता या संशयित आरोपीला अटक करणं हे पोलिसानंपुढचं आव्हान असणार आहे.
Accident News : औसा- तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; घटनेत तीन जणांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी
लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा - तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडलीय. भरधाव बीएमडब्ल्यू कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागील बाजूने धडक दिली. या घटनेत कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती कळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.