Omkar Pawar IAS Success Story : एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळा अपयश! साताऱ्याचा ओमकार कसा झाला IAS? वाचा शेतकर्याच्या लेकाची यशोगाथा
esakal March 07, 2026 12:45 PM

सातारा : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर साताऱ्यातील ओमकार पवार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करत आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार (Omkar Pawar IAS Success Story) केले. शेतकरी कुटुंबातून आलेल्या ओमकार यांनी अनेक अडचणींवर मात करत देशसेवेचे ध्येय पूर्ण केले.

सध्या ते नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत असून त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होत आहे. ओमकार पवार यांनी यूपीएससी परीक्षेत देशात १९४ वा क्रमांक मिळवला. देशासाठी काहीतरी मोठे करण्याची इच्छा मनात बाळगून त्यांनी या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे, आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयएएस होण्याचा निर्धार केला.

आईच्या स्वप्नासाठी घेतला UPSC चा निर्णय

ओमकार पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. आयएएस अधिकाऱ्यांना मिळणारा सन्मान पाहून आपल्या मुलालाही असा मान मिळावा, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. आईच्या या स्वप्नाने प्रेरित होऊन ओमकार यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि अखेर त्यात यश संपादन केले.

UPSC CSE Final Result 2025 Announced : UPSC CSE अंतिम निकाल 2025 जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात प्रथम, UPSC निकालात कोणी मारली बाजी? पाहा संपूर्ण यादी शिक्षण सरकारी शाळेतून, पुढे इंजिनियरिंग

ओमकार यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सरकारी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील एका महाविद्यालयातून इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. प्रत्यक्षात त्यांची इंजिनियरिंगमध्ये विशेष रुची नव्हती; मात्र कुटुंबाच्या इच्छेमुळे त्यांनी पदवी पूर्ण केली.

इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंत त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचा विचारही केला नव्हता. मात्र, आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांच्या कार्यातून प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Omkar Pawar IAS (@iasomkarr)