नागपूर : "पूर्वेश अमर रहे...", "भारत माता की जय..." अशा गगनभेदी घोषणा, जड अंत:करण आणि साश्रू नयनांनी नागपूरच्या सुपुत्राला आज मानेवाडा घाटावर अखेरचा निरोप देण्यात आला. वायुसेनेतील तरुण जवान पूर्वेश दुरुगकर यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी पूर्वेशने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंत्ययात्रेला उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
वायुसेनेच्या विशेष वाहनाने पूर्वेशचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. यावेळी वायुसेनेच्या जवानांनी दिलेली मानवंदना दिली. राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णयअंत्यविधीपूर्वी वायुसेनेच्या पथकाने पूर्वेशला विशेष मानवंदना दिली. यावेळी १२ जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्या आणि आपल्या सहकाऱ्याला अखेरची सलामी दिली. अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण झाल्यानंतर, लष्करी परंपरेनुसार पूर्वेशच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज अत्यंत सन्मानाने घडी करून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. तो तिरंगा हातात घेताना कुटुंबीयांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंनी उपस्थित जनसमुदायालाही हेलावून सोडले.
Nagpur Crime News : कामठीत बनावट नोटांचा पर्दाफाश; तीन व्यापाऱ्यांना अटक, कसा उघडकीस आला प्रकार?देशासाठी समर्पित वृत्तीने सेवा करणाऱ्या एका तरुण योद्ध्याला निरोप देताना संपूर्ण नागपूर जिल्हा शोकसागरात बुडाला होता. वयाच्या ज्या वळणावर स्वप्ने फुलतात, त्याच २६ व्या वर्षी पूर्वेशने देशाची सेवा बजावताना एक्झिट घेतल्याने परिसरातून दुःख व्यक्त होत आहे.