मुस्लिम तरुणाचे हिंदू मुलीशी ३ वर्ष प्रेमसंबंध; लग्नावेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांची धडक अन्... प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले
esakal March 07, 2026 11:45 PM

डोंबिवली : डोंबिवलीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या तरुणाला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. अरमान शेख असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत राहणारी पीडित तरुणी ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ती शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एफ.वाय.बी.कॉमला शिक्षण घेत आहे. अल्पवयीन असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची अरमान शेख याच्याशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले आणि जवळपास तीन वर्षे दोघांमध्ये संबंध होते.

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

दरम्यान, तरुणी १८ वर्षांची झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी ती भिवंडी येथे गेली. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुस्लिम पद्धतीने लग्न करण्यासाठी अरमान शेख याने काजी व साक्षीदारांना बोलावून सर्व तयारी केली होती. मात्र याची माहिती मिळताच काही हिंदूवादी संघटनांचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले आणि यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

घडलेल्या प्रकारानंतर हे प्रकरण शांतीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र दोघेही डोंबिवलीतील असल्याने शांतीनगर पोलिसांनी त्यांना पुढील कारवाईसाठी विष्णूनगर पोलिस ठाण्यात पाठविले. यानंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख याच्याविरोधात पोक्सो तसेच बलात्काराचा गुन्हादाखल केला.

Mumbai News: वृद्ध आईचा छळ करणाऱ्या मुलाला दणका! घर सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

तक्रारीत आरोपीने मैत्री करून शारीरिक संबंध ठेवले तसेच ब्लॅकमेल करून लग्नासाठी दबाव टाकत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी हा व्यवसायाने टेलर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.