इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले. एकमेकांवर मोठे हल्ले केले जात आहेत. तेहरान अमेरिका आणि इस्त्रायलच्या निशाण्यावर आहे. तेलसाठ्यांवर मोठे हल्ले केले जात आहेत. युद्धाला 10 दिवस पूर्ण झाली असून युद्ध लवकर थांबवण्याचे नाव घेत नाही. इराणकडूनही अनेक निर्बंध लादण्यात आली. अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोज्तबा खामेनेई यांची इराणचा सर्वाेच्च नेता म्हणून निवड करण्यात आली. मात्र, या निवडीनंतर ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटले की, इराणचा पुढचा सर्वोच्च नेता त्यांच्या संमतीशिवाय जास्त काळ टिकू शकणार नाही. हे विधान इराणच्या सत्तेला थेट धक्का देते असल्याचे दिसत आहे. आखाती देशांनाही या युद्धात ओढले गेले आहे. आखाती देश अमेरिकेवर नाराज आहेत. कारण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे अमेरिकेची होती. मात्र, आखाती देशांवर इराणकडून मोठे हल्ले केले जात आहेत. दुबईसह कतार आणि कुवेतचे मोठे नुकसान झाले.
कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण या युद्धात पराभव स्वीकारताना दिसत नसल्याने अमेरिकेचा थयथयाट बघायला मिळत आहे. शिवाय इराण अधिक घातक होत हल्ले करत असल्याने अमेरिकेसोबतच इस्त्रायलची झोप उडाली. त्यामध्ये आता इराणचे हल्ले कमी करण्यासाठी अमेरिकेने मोठा प्लॅन केला. इराणचे मिसाईल उद्ववस्थ करण्यासाठी अमेरिका सैन्य मैदानात उतरले आहे.
इराणचा युरेनियम साठा जप्त करण्याचा ट्रम्प यांचा प्लॅन आहे. अमेरिकन आणि इस्रायली कमांडो इराणी भूमीवर उतरू शकतात. 450 किलो युरेनियम जप्त करण्याची तयारीचे संकेत ट्रम्प यांनी दिले. कोणत्याही क्षणी अमेरिका आणि इस्त्रायलचे सैनिक इराणमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र, इराण ज्याप्रकारे याला उत्तर देईल, त्याची कोणी साधी कल्पना करू शकणार नाही.
इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे तेल अवीव पुन्हा एकदा हादरले आहे. इराणने डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात मध्य इस्रायलला टार्गेट करण्यात आले. ज्यामध्ये तेल अवीवमध्ये तीन लोक जखमी झाले. आता दोन्ही बाजूंनी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत.