Rohit Tilak : पुणे काँग्रेसमधून (Pune Congress) एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. लवकरच ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिल्यामुळं काँग्रेसमध्ये रोहित टिळक यांच्याबाबत नाराजी होती. अखेर काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) ना टिळक स्मारक ट्रस्ट यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या टिळक पुरस्कार दिला आहे. त्यामुळं काँग्रेसमध्ये रोहित टिळक आणि टिळक कुटुंबीय यांच्या विरोधात कुरबुर सुरु झाली होती. याच कुरबुर आणि स्वतःच्या तक्रारींना त्रासून काँग्रेस नेते रोहित टिळक यांना काँग्रेस पक्ष सोडावा लागत असल्याची माहिती मिळत आहे. रोहित टिळक यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे आहेत म्हणून नाही तर त्यांचं काम चांगलं आहे. त्यांचं व्हिजन चांगलं आहे. त्यामुळं त्यांना पुरस्कार दिला होता. मात्र त्यानंतर काँग्रेसने कायम नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचा हे नॅरो माईंड कधीपर्यंत सोसायचं, असं म्हणत रोहित टिळकांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
लोकमान्य यांच्या काळात काँग्रेस ही एक मोठी चळवळ होती. स्वातंत्र्य पूर्व काळापासून टिळक घराणं काँग्रेससोबत होतं. लोकमान्य टिळक हे मूळचे काँग्रेसीच होते. जयंतराव टिळक हे काँग्रेसचे खासदारही राहिलेत. रोहित टिळक यांनी 2009 आणि 2014 सालची कसबा विधानसभा काँग्रेसमधूनच लढली. रोहित टिळक हे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसही राहिले. पण, पंतप्रधान मोदींना मानाचा टिळक पुरस्कार दिला गेला. तेव्हापासून काँग्रेस हायकमांड आणि टिळक फँमिलीचा दुरावा वाढत गेला आणि आज अखेर ती स्वातंञ्य पूर्व काळापासूनती नाळ तुटल्यात जमा झाली आहे.
शिवसेनेकडूनच मला राज्यसभेच्या उमेदवारीबाबत विचारणा झाली म्हणूनच मी त्यादिवशी मुंबईला फॉर्म भरायलाही गेलो होतो. पण मविआकडून शरद पवार यांचे नाव पुढचं सगळंच थांबलंय पण तरिही भविष्यात शिवसेनेत एकनाथ शिंदेजी जी जबाबदारी देतील ती मी आनंदाने स्विकारेल, अशी घोषणा रोहित टिळक यांनी केली.