मोठी बातमी! अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना मोठा धक्का, आता पोलीस..
Tv9 Marathi March 24, 2026 10:45 PM

नाशिकचा भोंदू  अशोक खरात याचे एक -एक कारनामे आता समोर येत आहेत. दरम्यान अशोक खरात याच्या सोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आले होते. यावरून विरोधकांनी रुपाली चाकणकर यांची चांगलीच कोंडी केली, सरकारवर देखील दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अखेर त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली . मात्र जरी चाकणकर यांनी राजीनामा दिला असला तरी देखील त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे कॅप्टन अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी होणार आहे. नाशिक पोलिसांकडून शिवनिका स्ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार आहे. या ट्र्स्टमध्ये रुपाली चाकणकर या देखील सदस्य असल्यामुळे आता त्यांची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून सभागृहात निवेदन देखील देण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना खरात याच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांची देखील चौकशी होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा 

अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि खरात याचे एक -एक प्रकरणं समोर येण्यास सुरुवात झाली. दरम्यान अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांचे देखील काीह फोटो आहेत. या फोटोमुळे त्या चांगल्याच अडचणीत सापडल्या. विरोधकांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली, अखेर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.  आता त्यानंतर खरात याच्या शिवनिका स्ट्रस्टवर जेवढे सदस्य आहेत, त्यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार आहे.  रुपाली चाकणकर या देखील या स्ट्रस्टवर सदस्य आहेत, त्यामुळे त्यांची देखील नाशिक पोलिसांकडून आता चौकशी होणार आहे.

या प्रकरणात आतापर्यंत अशोक खरात विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व गुन्हे अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. आज पुन्हा एकदा त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.