IND vs SA: टीममध्ये निवड, मात्र प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधीची प्रतिक्षा कायम, 7 वर्षांनंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक होणार?
Tv9 Marathi March 25, 2026 07:45 AM

वुमन्स टीम इंडियान आयपीएलच्या 19 व्या मोसमादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. वुमन्स टीम इंडिया या दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने 24 मार्च रोजी भारतीय संघाची घोषणा केली. या 15 सदस्यीय भारतीय संघात भारती फुलमाळी हीला संधी देण्यात आली. भारती शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा 2019 साली खेळली होती. त्यामुळे भारतीची गेल्या 7 वर्षांपासून प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळण्याची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनिमित्ताने भारतीची ही प्रतिक्षा संपणार का? हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे.

भारतीची क्रिकेट कारकीर्द

भारतीने 2019 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. भारतीने इंग्लंड विरुद्ध टी 20i सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. भारतीला इंग्लंड विरुद्ध या मालिकेत 2 टी 20i सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्यानंतर भारतीची प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेशाची प्रतिक्षा कायम आहे.

भारतीला त्यानंतर टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी अनेक वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. भारतीला काही आठवड्यांआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली. मात्र भारतीला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे भारतीला 7 वर्षांनंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमथ्ये संधी मिळते का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

भारतीची आंतरराष्ट्रीय आणि टी 20 कारकीर्द

भारतीने टीम इंडियासाठी 2टी 20 सामन्यांमध्ये 23 धावा केल्या आहेत. तसेच भारतीने डब्ल्यूपीएल स्पर्धेत एकूण 3 सामने खेळले आहेत. भारतीने या 3 सामन्यांमध्ये 64 धावा केल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.