आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 नंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात टी 20 सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आयपीएलच्या 19 व्या हंगामातील पहिल्या फेरीत 16 दिवसांत 20 सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान एकूण 4 डबसल हेडरसह 20 सामने होणार आहेत. त्यानंतर आज 26 मार्च रोजी दुसऱ्या फेरीतील उर्वरित 50 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व 10 संघांचे प्रत्येकी 14 सामने कोणत्या स्टेडियममध्ये आणि कधी होणार? हे स्पष्ट झालं आहे. एकूण 12 शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने आयोजित करण्यात आले आहेत. या निमित्ताने आपण या 19 व्या मोसमातील वेळापत्रकाबाबत 10 प्रमुख मुद्दे जाणून घेऊयात.