मुंबई : आंबिवली ते टिटवाळा दरम्यान पंजाब एक्सप्रेससमोर (Punjab Express Accident) अचानक अज्ञात व्यक्ती आल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. यामुळे दीड तासाहून अधिक वेळ गाड्या उशीरा धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच या मार्गावरील काही लोकल रद्दही करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पंजाबकडे जाणाऱ्या पंजाब एक्सप्रेससमोर ही व्यक्ती आली. धडक इतकी भीषण होती की संबंधित व्यक्ती इंजिनखाली अडकली. त्याला बाहेर काढण्यासाठी आणि मदत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते.
या घटनेनंतर टिटवाळा आणि कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या मोठ्या प्रमाणात उशिराने धावत आहेत. तसेच जवळपास दीड तास अनेक लोकल गाड्या मधेच थांबल्यांचं दिसून आलं. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या घटनेमुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांना लोकलमध्येच अडकून पडावं लागल्याचं दिसून आलं. या दरम्यान काही गाड्या केवळ कल्याणपर्यंत चालवण्यात आल्या होत्या. तर कसारा आणि टिटवाळा दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल दीड तासानंतर रेल्वे प्रशासनाकडून परिस्थिती सुरळीत करण्यात आल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा :