सातारा : येथील माची पेठेत राहणाऱ्या एकाने सज्जनगडावरून उडी मारून आत्महत्या केली (man jumps from Sajjangad fort Satara) आहे. संदेश शंकर पडियार (वय ३४, रा. माची पेठ) असे त्याचे नाव आहे. तो येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक ताण-तणावाखाली होता.
काल (ता. २७) सकाळी साडेदहा वाजता तो घरातून बाहेर गेला होता. घरातून निघाल्यावर तो सज्जनगडावर गेला. तेथील दक्षिण बाजूच्या कड्यावरून त्याने 200 फूट खोल दरीत उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सज्जनगड फिरायला आलेल्या पर्यटकांसमोरच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Builder Shot Dead in Kankavli : कणकवली हादरली! तरुण बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात झाडल्या गोळ्या; मध्यरात्रीच्या 'त्या' वादाचा रक्तरंजित शेवटदरम्यान, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गडाखालील लोकांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने ही माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार वायदंडे व कर्णे तातडीने घटनास्थळी गेले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संदेशच्या मागे पत्नी, एक पाच वर्षांचा मुलगा व एक तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.