Thane Electricity Supply ठाणे : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) वाशी परिमंडळातील ठाणे भागात आज सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पडघे-वाडा वीजवाहिनीवर क्षमतावाढीसाठी कुडूस उपकेंद्र जोडणीचे काम सुरू होते. याचदरम्यान खारबाव-कोलशेत या वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड (ट्रीप) झाल्याने ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल झाली आहे. यात कोलशेत परिसर, घोडबंदरचा शहरी भाग तसेच वाडा येथे वीजपुरवठा खंडित झाला असून भारनियमन करावे लागले आहे. या संदर्भात आता एक महत्वाची अपडेट पुढे आली आहे.(Thane Ghodbunder Power Cut)
Thane Ghodbunder Power Cut : ठाणे अंधारात; खंडित वीजपुरवठा दुपारपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता
दरम्यान, कोलशेतमधील 100 के. व्ही.ची वाहिनी पूर्ववत करण्यात आल्यामुळे काही भागातील वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. खारबाव-कोलशेत ही वाहिनी खाडी क्षेत्रातून जात असल्याने दुरुस्ती कामास विलंब होत आहे. मात्र, महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महापारेषणकडून नागरिकांना आवाहन
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली संचालक (संचलन) सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेश भागवत आणि अधीक्षक अभियंता विजय आवारे यांच्या देखरेखीखाली दुरुस्तीचे काम सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषणकडून करण्यात आले आहे.
विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
मिळलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहा वाजल्यापासून ठाणे शहरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यात वागळे इस्टेट, वसंत विहार, घोडबंदर रोड, ओळवा आणि कोलशेत या ठिकाणाहून होणार विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर काही ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे. पडघा येथे EHV (एक्स्ट्रा हाय होल्टेज) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा ठाणे शहरात खंडित झाला आहे. एकीकडे तापमाणाचा पारा वाढलेला असताना नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी नागरिकांना हाल सोसावे लागत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या