Karan johar and ananya pandey viral video: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते करण जोहर (Karan Johar) आणि अनन्या पांडे (Ananya pandey) यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियात प्रचंड चर्चा रंगली आहे. या व्हिडीओची इंटरनेटवर बरीच चर्चा सुरू आहे. खरंतर दोघांची व्हायरल क्लिप 'कॉल मी बे' सिझन 2 च्या अनाउंसमेंट वेळची आहे. दरम्यान, अलिकडेच दोघांमध्ये झालेल्या संभाषणामुळे ही क्लिप व्हायरल होत आहे. अनन्या आणि करणचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर हॉट टॉपिक बनला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकता की, करणने भर कार्यक्रमात अनन्यासोबत असं काही केलं की, काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकता करण आणि अनन्या एका कार्यक्रमात उपस्थित आहेत. करणने अनन्याच्या कमरेला स्पर्श केल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर अनन्या क्षणभर त्याच्याकडे वळून हसते. ज्यानंतर ते दोघे कॅमेऱ्यासमोर एकत्र पोज देताना दिसले. करणचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी अनन्याला अशा पद्धतीने स्पर्श केल्याबद्दल ट्रोल केलं आहे.
एक्सवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी टीका करत संताप व्यक्त केला. एका युझरने हा क्लिप शेअर करत कॅप्शनमध्ये, 'असं वाटतंय की, करण जोहरने अनन्या पांडेला अनकंफर्टेबल केलं आहे'. तर इतर काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनन्या किंवा करण जोहरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Look like karan Johar make Ananya pandey Uncomfortable 🤯 pic.twitter.com/PSxRsWERbW
— Sumit (@beingsumit01) March 28, 2026
अनन्या पांडेचा 'कॉल मी बे' चा पहिला सिझन 2024 रोजी रिलिज झाला होता. आता या सिरीजचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा शो अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे. या नव्या सिझनमध्ये 'बे' स्वत:चा न्यूज शो सुरू केल्यानंतर मिळालेली नवीन प्रसिद्धी कशी सांभाळते हे दाखवण्यात आले आहे. अभिनेत्री श्रुती हासन देखील या सिझनमध्ये झळकणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: