Khultabad Accident : नंद्राबाद गांवाजवळ आयशर दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यु; एक गंभीर जखमी
esakal April 02, 2026 12:45 AM

खुलताबाद - खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर रोडवरील नंद्राबाद गांवाजवळ बुधवारी (ता. एक) दुपारी आयशर ने दुचाकीला दिलेल्या धडकेने दोन जण मयत, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

या बाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील कागजीपुरा येथे विट भट्टीवर कामास असलेले मूळचे वरझडी फाटा (ता. गंगापुर) येथील किशोर सोमिनाथ सोनवणे (वय-३१), पुजा किशोर सोनवणे (वय-२७), व शिव किशोर सोनवणे (वय-एक वर्षे) हे दुचाकीने खुलताबाद येथील आठवडी बाजारासाठी जात असतांना नंद्राबाद गावाजवळील वळणार खुलताबादहून कामगार कल्याण केंद्राच्या लाभार्थ्यांच्या पेट्या खाली करून आयशर ट्रक क्रमांक एम.एच,२१,बी.एच.४३३८ ने या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीवरील वडील व चिमुकला जागीच मयत झाले. पत्नी मात्र जखमी झाली आहे. या दोघांचे मृतदेह शव विच्छेदनसाठी खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात आणण्यात असून, जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी खुलताबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी तातडीने भेट घेवून, रहदारी मोकळी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.