IPL 2026 Points Table : केकेआर-पंजाब सामना पावसामुळे रद्द, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?
Tv9 Marathi April 07, 2026 08:45 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या 12 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने होते. सामना रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. या 1 गुणामुळे सलग 2 सामने गमावणाऱ्या केकेआरचं खातं उघडलं. हा सामना रद्द झाल्याने केकेआरला आपल्या पहिल्या विजयासाठी मॅचची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर सलग 2 सामने जिंकणाऱ्या पंजाबची केकेआर विरुद्धचा सामना रद्द झाल्याने विजयी हॅट्रिक मिळवण्याची संधी हुकली. आता या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलचं काय चित्र आहे? हे आपण जाणून घेऊयात.

कोलकाताने पंजाब विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र केकेआरच्या डावातील 3.4 ओव्हरनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे.

सामना रद्द झाल्याने पंजाबचा फायदा

केकेआर विरुद्ध पंजाब सामना रद्द झाला. पंजाबने आधीच सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यात केकेआर-पंजाब सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात एकूण 5 गुण झाले. पंजाबला या विजयामुळे फायदा झालाय. पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मागे टाकून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. पंजाबने पहिल्या स्थान मिळवल्याने आरसीबीची पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, पंजाबने 3 पैकी 2 सामने जिंकेल आहेत. तर पंजाबला एकदा पराभूत व्हावं लागलंय. पंजाबचा नेट रनरेट हा +0.637 असा आहे. तर आरसीबीची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

केकेआर 8व्या स्थानी

तसेच केकेआरचं हा सामना रद्द झाल्याने गुणांचं खातं उघडलं. केकेआरला यासह पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी पोहचली आहे. केकेआर या सामन्याआधी नवव्या स्थानी होती.

चेन्नई शेवटून नंबर 1

दरम्यान सलग 3 पराभवांनतर चेन्नईची पॉइंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानी घसरण झाली आहे. चेन्नईची पहिल्या तिन्ही सामन्यात अपवाद वगळता निराशाजनक कामगिरी राहिली आहे.

मंगळवारी मुंबई-दिल्ली सामना

दरम्यान मंगळवारी 7 एप्रिलला 19 व्या मोसमातील 13 वा सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना होणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात विजय मिळवून विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.