मुंबई: जागतिक राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींचे सकारात्मक पडसाद आज भारतीय शेअर बाजारात (Share Market) उमटले आहेत. युद्धाच्या छायेखाली असलेल्या जगाला 'सीझफायर'च्या (युद्धविराम) निर्णयाने मोठा दिलासा मिळाल्याने आज भारतीय शेअर बाजार एका मोठ्या उसळणीसह उघडला. प्री-ओपनिंग सत्रातच सेन्सेक्सने तब्बल २७०० हून अधिक अंकांची ऐतिहासिक झेप घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.(Share Market) युद्धविरामानंतर भांडवली बाजारात तेजी आल्याचं दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये २ हजार ७०० अंकांची उसळी तर निफ्टी ७५० अंकांनी वधारला आहे. आयटी, मेटल, रिअॅल्टी क्षेत्रातील समभागात मोठी तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या भावात देखील मोठी घसरण झाली आहे, १३ टक्क्यांनी दर पडले आहेत. कच्च्या तेलाचे भाव ९५ डाॅलर प्रति बॅरलवर आले आहेत. अदानी पोर्ट, इंडिगोच्या समभागात मोठी उसळी पहायला मिळत आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षात 'सीझफायर' म्हणजेच युद्धविरामाची घोषणा झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली स्थिरता आणि जागतिक पुरवठा साखळी पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जगभरातील शेअर बाजारांनी या निर्णयाचे स्वागत केले. याचाच थेट परिणाम आज मुंबई शेअर बाजाराच्या (BSE) सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) निफ्टीवर दिसून आला.
Share Market : सेन्सेक्सची झेप: प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स २७०० पेक्षा जास्त अंकांनी वधारला.
Share Market : निफ्टीमध्येही तेजी: निफ्टीनेही मोठी पातळी ओलांडत गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला.
Share Market : जागतिक परिणाम: आशियाई आणि युरोपियन बाजारातील तेजीचा भारतीय बाजाराला पाठिंबा मिळाला.
तज्ज्ञांच्या मते, जर सीझफायरची स्थिती कायम राहिली आणि जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित झाली, तर भारतीय शेअर बाजार येत्या काही दिवसांत नवे उच्चांक प्रस्थापित करू शकतो.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध (Iran US War) अखेर आज थांबलं आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले आहे.
इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती. या अटीला इराणनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जात आहे. तसेच इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे. जो आता अमेरिकन बाजू वाटाघाटीसाठी पुढे करणार आहेत. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून 10 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरु होईल. (Iran US War Ceasefire)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यास संमती दिल्यानंतर आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे आज आशियाई बाजारपेठांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. जपानच्या निक्केई २२५ (Nikkei 225) मध्ये १.७९ टक्क्यांची उसळण दिसून आली, तर टॉपिक्स (Topix) मध्ये १.६९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. दक्षिण कोरियाच्या कोस्पी (Kospi) मध्ये ५.९९ टक्के आणि स्मॉल-कॅप कोस्डॅक (Kosdaq) मध्ये सुमारे ५ टक्क्यांची तेजी आली आहे.
वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड फ्युचर्स १४ टक्क्यांनी घसरून ९७.४९ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे, जे १०० डॉलरच्या मानसशास्त्रीय पातळीच्या खाली आहे. याचा अर्थ असा की, बाजारपेठेला आता युद्धाची तातडीची भीती उरलेली नाही. ब्रेंट क्रूड फ्युचर्स आज सकाळी १३ टक्क्यांनी घसरून ९५.६३ डॉलरवर आले आहे. COMEX वर कच्च्या तेलाच्या किमतीत १३.३३ टक्क्यांची घसरण झाली असून ते ९७.८९० डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.