Jalna News: पंधरा अतिक्रमणांवर हातोडा; बसस्थानक परिसरात महापालिकेची कारवाई
esakal April 08, 2026 01:45 PM

जालना: शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करत महापालिकेने मंगळवारी (ता.सात) नाल्यांवरील व अंडरग्राउंड ड्रेनेज लाइनवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत १५ दुकानांचे अतिक्रमण हटवण्यात आले.

शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणाचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष पथक स्थापन केला आहे. मात्र, महापालिकेच्या या विशेष पथकात केवळ पथक प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.

शस्त्रसंधीसाठी अटी! होर्मुझवर इराणसह ओमानही आकारणार टोल; भारताकडूनही वसुली?

त्यामुळे शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम रेंगाळत पडली होती. मात्र, अखेर मंगळवारी महापालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे.

शहरातील वाहतूक शाखा कार्यालयापासून ते बसस्थानकादरम्यान अंडरग्राउंड नाले व ड्रेनेज लाइनवर अतिक्रमण केलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. १५ दुकानांचे अतिक्रमण हटवण्यात आले. नाले व ड्रेनेज लाइनवर दुकानांच्या आलेल्या पायऱ्यांसह दुकानांचे इतर अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने महापालिकेने काढून घेतले. या कारवाईमुळे शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे.

Kolhapur News : झेडपी CEO डॉ. जास्मिन पदभार घेताच अॅक्शन मोडवर, आरोग्य प्रशासन अधिकाऱ्याला नोटीस; सर्व विभागांना भेटी पथकाला मिळेना मनुष्यबळ

शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अतिक्रमण विरोधी पथक स्थापन केले आहे. या पथकाच्या प्रमुखपदी सॅमसंग कसबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पथकात इतर कर्मचारी दिले नाहीत. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी मनुष्यबळच नाही. या पथकाला किमान सहा कर्मचारी, एक जेसीबी, आणि इतर साहित्य मिळाले तर शहरातील अतिक्रमण मुक्तीची कारवाई अधिक प्रभावीपणे राबवली जाऊ शकते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.