पार्थ पवार हायफाय इंग्लिश मिडीयममध्ये शिकलेले, त्यांना काँग्रेसचा डाऊनफॉल… काँग्रेसच्या आकाश
Marathi April 08, 2026 03:25 PM

बारामती: बारामती पोटनिवडणुकीच्या (Baramati byelection 2026) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे (Akash More) यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी सरकारने एफआयआर दाखल केल्यास आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असं वक्तव्य त्यांनी दिला आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना मोरे यांनी सध्याच्या भावनिक वातावरणातही जनतेच्या मनातील प्रश्न मांडून विजय मिळवू, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पार्थ पवार यांच्या वक्तव्यावरही त्यांनी कडव्या शब्दांत टीका करत प्रचाराच्या रणनितीवर भाष्य केले.(Baramati byelection 2026)

Akash More On Baramati Election : तर आम्ही लगेचच आमचा अर्ज माघारी येऊन अन्यथा…

बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस कडून सातत्याने विनंती केली जात आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मात्र काँग्रेस आपल्या निर्णयावरती ठाम असल्याचं दिसून येत आहे. तर या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे उमेदवार आकाश मोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की काँग्रेसने काही अटी यापूर्वी टाकलेल्या आहेत, ज्या आम्ही म्हणतो आहे की, या सरकारने भाजप प्रणित सरकारने अजित दादांचा घातपात आहे की अपघात आहे, याविषयी एफआयआर नोंदवावी आणि आम्ही अजूनही तयार आहोत, त्यांनी एफआयआर नोंदवल्यानंतर आम्ही लगेचच आमचा अर्ज माघारी येऊन अन्यथा आम्ही निवडणूक लढणार आहोत. अजित दादांना न्याय मिळावा आणि लोकशाही टिकावी या महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण पुनर्जीवित करावं, शरद पवारांनी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी जे राजकारण केलं, त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांचे जसे कॉर्डिनेशन होते, ते पूर्ण संपुष्टात आलेले आहेत तसे पुन्हा व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जर विधान भावनांमध्ये चांगला भाषण करणारा विरोधी आमदार असेल तर सत्ताधारी आमदार त्याला पाठीवर थाप टाकायचा आणि आता हाणामारी होते, ही अधोगती लोकशाहीची झाली, ज्या पद्धतीने झाली याच्या विरोधात याचा प्रतिक म्हणून मी निवडणुकीसाठी उभा आहे असे त्यांनी म्हटलं आहे.

Akash More On Baramati Election : आमच्या काँग्रेसचा एक कार्यकर्ता हजार हजारांच्या बरोबर

काँग्रेस आपली भूमिका नेहमी मांडत असते, संविधान वाचवण्याची जबाबदारी एका माणसावर आलेली आहे, ती काँग्रेस जबाबदारीने पेलत आहे, आमच्या काँग्रेसचा एक कार्यकर्ता हजार हजारांच्या बरोबर आहे, आमच्याकडे पैशाचा पॅकिंग नाही कसली पावर नाही, असे पुढे ते म्हणाले.

Akash More On Baramati Election : त्यांना मराठी शब्द सापडला नसेल

पार्थ पवारांच्या वक्तव्यावर बोलताना मोरे म्हणाले, मी सेमी इंग्लिशमध्ये शिकलेला माणूस आहे, तरी मला मराठीचे काही, काही शब्द येत नाहीत, ते इंग्लिश मीडियम हाय फायमध्ये शिकलेले, त्यांना तेच म्हणायचं होतं की, दम द्यायचं होता, काय करायचं होतं, माहिती नाही. पण, मला असं वाटतंय की त्यांना मराठी शब्द सापडला नसेल, त्यामुळे ते डाऊनफॉल म्हणाले असतील असं मला वाटतं.

Akash More On Baramati Election :  नंतर आम्ही आमची भूमिका घेऊ

आज आणि उद्या अर्ज माघारी घ्यायची वेळ आहे, राष्ट्रवादी सातत्याने आवाहन करत आहे, तुम्ही उमेदवारी अर्ज माघार घ्याल का? या प्रश्नावर उत्तर देताना मोरे म्हणाले, मी सातत्याने सांगतो, माझ्या मुलाखतीमध्ये किंवा लोकांशी बोलतानाही सांगतो, मी पुरोगामी विचाराचा, मी काँग्रेस पार्टीचा, राहुल गांधींचा, सपकाळ साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, आणि मला असं वाटतं की जे काही ते सांगतील, शेवटच्या क्षणापर्यंत जे ते आदेश देतील, ते पाळेन. त्याचबरोबर हे सरकार, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या अपघात की घातपात याबाबत काही सकारात्मक गोष्टी केली, चौकशा केल्या किंवा एफआयआरची तर आम्ही अपेक्षा करतो आहे, पण आम्हाला काही संकेत दिसले तर आमच्या ज्येष्ठांकडून ते आम्हाला सांगण्यात येईल, नंतर आम्ही आमची भूमिका घेऊ, असंही मोरे म्हणाले आहेत.

आणखी वाचा – Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.