Zareen Khan Mother Parveen Khan Death: मनोरंजनसृष्टीतून (Entertainment News) एक दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अॅक्ट्रेस झरीन खानवर (Zareen Khan) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीची आई परवीन खान यांचं निधन (Entertainment News) झालं आहे. 8 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबाबत कुटुंबियांनी एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. माहितीनुसार, परवीन खान यांच्यावर बुधवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सतत प्रकृती बिघडत असल्याकारणाने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. वयोमानानुसार होणाऱ्या आजारांनी झरीनची आई प्रचंड त्रस्त होती. दरम्यान, आज त्यांची प्राणज्योत मालवली. झरीन खानच्या आईच्या निधनानंतर नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली आहे. दरम्यान, अद्याप झरीन खानने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
प्रकृती खालवल्याने झरीन खानची आई परवीन खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. झरीनने कायम सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या आईच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती देत होती. रुग्णालयातून परतल्यानंतर काही काळ त्यांची तब्येत बरी झाली होती. परंतु, 2026 च्या सुरुवातीला त्यांना पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर झरीन खानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिनं चाहत्यांना तिच्या आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले होते.
झरीन खानसाठी तिची आई सर्वात मोठा आधार होती. 2016 साली तिच्या आईवर हार्ट सर्जरी झाली होती. यानंतर अभिनेत्रीने आईची काळजी घेण्यासाठी आपल्या सर्व कामातून काही काळासाठी विश्रांती घेतली होती. दरम्यान, आईच्या निधनानंतर झरीन खान पूर्णपणे खच्चून गेली आहे. अभिनेत्रीनं अद्याप तिच्या आईच्या निधनाबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही. झरीन खान बऱ्याचदा आपल्या आईसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या फोटोंवर कायम लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. दरम्यान, झरीन खानच्या आईच्या निधनानंतर चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
झरीन खानच्या टीमने सोशल मीडियात पोस्ट शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. 'आम्ही अत्यंत जड अंत:करणाने आपणास कळवत आहोत की, झरीन आणि सना खान यांच्या आई परवीन खान यांचं 8 एप्रिल रोजी निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता मुंबईतील वर्सोवा परिसरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आलीये. जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले'. या पोस्टवर नेटकरी तसेच चाहत्यांनी कमेंट करुन श्रध्दांजली वाहिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: