एलईटीचा क्रूर दहशतवादी अबू हुरैरा जेरबंद : एकूण 5 दहशतवादी ताब्यात
वृत्तसंस्था/ श्रीनगर
दहशतवाद विरोधात जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या अभियानात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत 5 जणांना अटक केली आहे. लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल्ला उर्फ अबू हुरैरा हा मागील 16 वर्षांपासून वाँटेड होता.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी राजस्थान आणि हरियाणा समवेत 19 ठिकाणी छापे टाकत गुन्ह्यांकरता वापरण्यात येणारी सामग्री हस्तगत केली आहे. चौकशीदरम्यान लष्कर-ए-तोयबाच्या फैलावलेल्या नेटवर्कचा भांडाफोड झाला आहे. हे नेटवर्क दहशतवाद्यांना मदत पोहोचवित होते.
दोन पाकिस्तानी दहशतवादी ताब्यात
अबू हुरैरासाब्sात आणखी एक पाकिस्तानी दहशतवादी उस्मान उर्फ खुबैबलाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईत जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत केंद्रीय यंत्रणाही सामील होत्या. अटक करण्यात आलेल्या 5 जणांपैकी तीन जण मोहम्मद नकीब भट, आदिल राशिद भट आणि गुलाम मोहम्मद मीर उर्फ मामा हे श्रीनगरचे रहिवासी आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या आरोपींवर दहशतवाद्यांना आश्रय तसेच भोजनसमवेत रसद पुरविण्याचा आरोप आहे.
एक विदेशी दहशतवादी फरार
एक विदेशी दहशतवादी बनावट दस्तऐवज आणि ओळखपत्राच्या आधारावर देशाबाहेर जाण्यात यशस्वी ठरल्याचे संकेत तपासातून मिळाले आहेत. संबंधित दहशतवादी हे 16 वर्षांपासून घुसखोरी करत भारतात दाखल झाले होते आणि यादरम्यान ते काश्मीर खोऱ्याच्या विविध जिल्ह्dयांमध्ये सक्रिय राहिले. तसेच त्यांनी सुमारे 40 विदेशी दहशतवाद्यांना मदत पुरविली होती, ज्यातील बहुतांश जण सुरक्षा दलांच्या कारवाईत मारले गेले आहेत.