पूर्णा: येथील तहसील कार्यालयाने मागील आर्थिक वर्षात महसूल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या दीडपट वसुलीचा विक्रम केल्याची माहिती तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी दिली. यावेळी त्यांनी महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
मागील आर्थिक वर्षात महसूल विभागाला १४ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट ओलांडत विभागाने २२ कोटी रुपयांहून अधिकची वसुली केली. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व घर पडझड प्रकरणांसाठी १३ लाख ८१ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, ३४४ लाभार्थींना त्याचा फायदा झाला.
शस्त्रसंधीसाठी अटी! होर्मुझवर इराणसह ओमानही आकारणार टोल; भारताकडूनही वसुली?तसेच मृत जनावरांच्या ५१ प्रकरणांत १५ लाख ९१ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग योजनेअंतर्गत संजय गांधी योजनेतील १,३१६ व श्रावणबाळ योजनेतील ११५२ लाभार्थींची यूडीआयडी ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे.
उर्वरित लाभार्थींची पडताळणी सुरू असून, एकूण काम ८८ टक्के पूर्ण झाले आहे. स्मशानभूमीसंदर्भातील १७ गावांतील प्रलंबित प्रश्नांपैकी बहुतेक प्रश्न सोडविण्यात यश आले असून, केवळ तीन गावांचे प्रश्न बाकी आहेत.
Mugdha Karnik Controversy: अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी माफी मागावी; श्री विठ्ठल भक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्य, मंदिर समितीचे पत्रक प्रसिद्ध!या सर्व कामांत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, सहकारी नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पंढरीनाथ शिंदे, सतीश नाईक, मंडळ अधिकारी, तलाठी व महसूलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले. म्हणूनच आपण लक्षवेधी काम करू शकलो, असे उद्गार तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी काढले.