"तुझा जेवढा पर डे तेवढंच बोल" सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध अभिनेत्रीची सेटवर काढलेली लायकी ; म्हणाली..
esakal April 09, 2026 06:45 PM

Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिच्या झालेल्या अपमानाचा अनुभव शेअर केला. एक दिवसाची सुट्टी मागण्यावरून तिची सेटवर लायकी काढल्याचं तिने सांगितलं. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.

ही अभिनेत्रीला आहे विदिशा म्हसकर. विदिशाने आजवर विविध भूमिका मालिकांमध्ये साकारल्या आहेत. काही काळापूर्वी तिने राजश्री मराठी चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी तिने तिला आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं.

ती म्हणाली की,"कलाकारांचा कधीच मला सेटवर वाईट अनुभव आला नाहीये. पण काही लोक आहेत जे शुटिंगचं वेळापत्रक मॅनेज करतात, ठरवतात. पण सगळेच असे नाहीयेत शंभरातील दहा जण असे असतील जे तुम्हाला त्रास द्यायलाच बसलेले असतात. एक व्यक्ती आहे मला वाटतं हे मन बावरेच्या वेळेचीच गोष्ट आहे. मी त्या व्यक्तीवर खूप जास्त विश्वास ठेवला. माझा स्वभाव आहे जास्त फ्रॅंक होण्याचा. तर मी सगळं जाऊन सांगायचे. "

"असं करता करता एक दिवस असं झालं की, मी अनेक दिवस रात्री 2 ला पॅकअप व्हायचा परत सकाळी 6:30 चा कॉल टाईम असायचा. त्यामुळे असं करून करून मला जाणवायला लागलं की माझी झोप होत नाहीये. मला झोपेची गरज आहे. मी एकदा विनंती केली की मला फक्त एक दिवसाची सुट्टी दे कारण बाकी सगळे आठ तासांची शिफ्ट करायचे. कारण ते सिनियर कलाकार होते. ते स्पष्टपणे सांगायचे की आम्ही सहा तास किंवा आठ तास झोप झाल्याशिवाय आम्ही येणार नाही. तर मी फक्त म्हणाले की एक दिवस मला लेटचा कॉल टाइम दे. तर तो मला म्हणाला असं असेल ना तर तू प्रोड्युसरशी बोलून घे."

"आणि सगळ्यात घाणेरडं वाक्य त्यामध्ये हे होतं ए तुझा पर डे असेल तेवढंच बोल. माझं असं झालं की या व्यक्तीला आपण मित्र मानलं होतं. त्या व्यक्तीचं काही काम अडलं पण नव्हतं. त्याला काही छोटे बदल करावे लागणार होते म्हणून जर मला हे ऐकवलं जात असेल तर लोकांना त्यांची जेवढी पातळी आहे तिथे ठेवलं पाहिजे. त्यामुळे लोकांची जी पातळी आहे तिथेच त्यांना ठेवलं होतं. त्यावेळी मी काही उत्तर दिलं नाही पण आता मला वाईट वाटतं की मी काही उत्तर दिलं नाही."

"त्या व्यक्तीला मी थँक यु म्हणेन की त्याच्यामुळे मी प्रोफेशनली वागायला शिकले. आता मी वाईट वागत नाही पण नाही म्हणजे नाही. माझ्याकडून मी जितकी जमेल तितकी तडजोड करते. पण मी गोष्टी स्पष्टपणे सांगते." असं ती पुढे म्हणाली.

‘एवरीबडी लव्स सोहराब हांडा’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! 10 तारखेला होणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.