गोपनीयता भंग; दोघांचे निलंबन
esakal April 12, 2026 10:45 PM

पिंपरी, ता. १२ ः अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या गोपनीय माहितीचा भंग केल्याप्रकरणी महापालिकेने दोघांना निलंबित केले आहे. त्यात कनिष्ठ स्थापत्य अभियंता संदीप हजारे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शेषराव अटकारे यांचा समावेश आहे. प्रभाग २९ पिंपळे गुरव आणि प्रभाग ३२ जुनी सांगवी येथील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार होती. याची माहिती संबंधितांना पुरवून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप हजारे यांच्यावर आहे. तर अतिक्रमण विरोधी कारवाई केली नाही. त्याचा अहवाल दिला नाही, असा आरोप अटकारे यांच्यावर आहे. दोघांनाही महापालिका सेवेतून निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.